Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री पूजा बत्रा वयाच्या ४४ व्या वर्षीही आपल्या अदांनी करतेय सर्वांना घायाळ; बिकिनी घालून केला पतीसोबतचा फोटो शेअर

अभिनेत्री पूजा बत्रा वयाच्या ४४ व्या वर्षीही आपल्या अदांनी करतेय सर्वांना घायाळ; बिकिनी घालून केला पतीसोबतचा फोटो शेअर

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पूजा बत्रा तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. 90 च्या दशकात ती जेवढी चर्चेत होती, तेवढीच तिची क्रेझ आज देखील पाहायला मिळते. पूजा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पूजाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

पूजा ४४ वर्षांच्या वयातही सर्वांना घायाळ करतेय. ती एकदम फिट आणि बोल्ड आहे. तिने नुकतेच आपले बोल्ड फोटोशूट करून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. या फोटोमध्ये ती तिचा पती नवाब सोबत दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. पूजाचा हा एक थ्रोबॅक फोटो आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मिस्टर एँड मिसेस शाह.” हा फोटो आपण दोघांनी एकत्र केलेल्या पहिल्या फोटोशूटचा आहे.” या फोटोमध्ये पूजा जेवढी फिट दिसत आहे. तेवढाच नवाब देखील फीट दिसत आहे.

पूजाने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या फोटोला प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पूजा तिच्या बोल्ड फोटोमुळे सर्वत्र चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनीमधील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून तिने तिच्या बॉडीचे आणि उंचीचे कौतुक केले आहे. पूजाची उंची खूप आहे. 90 च्या दशकात ती तिच्या उंचीमुळे खूप चर्चेत होती. त्यामुळे उंचीने जास्त असलेले अभिनेते तिच्यासोबत काम करायला लगेच तयार होत असत.

पूजा बत्रा आज भलेही सिल्व्हर स्क्रीनपासून लांब आहे, तरीही सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. प्रत्येक दिवशी ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती आता तिचा पती आणि कुटुंब सोबत एन्जॉय करत आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये अनिल कपूर आणि तब्बू यांच्या ‘विरासत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या सोबतच तिने ‘भाई’, ‘हसीना मान जायेंगी’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘कही प्यार ना हो जाये’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कश्मीर कली!’ माहिरा शर्माचे ग्लॅमरस फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा पाहाच

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा 

हे देखील वाचा