Tuesday, July 9, 2024

अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद

बॉलिवूडमध्ये आपल्याला 70 च्या दशकापासूनच बोल्ड आणि हॉटनेट पाहायला मिळत आहे. पुढे नव्वदच्या दशकात अभिनेत्री अधिकच बोल्ड झाल्याचे दिसते. याच काळातील एक अभिनेत्री म्हणजे पूजा बेदी होय. पूजाने अभिनयासोबतच आपल्या बोल्ड अदांमुळेही चाहत्यांमध्येे एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ती आपल्या हॉटनेससाठी नेहमीपासूनच चर्चेचा विषय ठरत आली आहे. तिला अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही पाहिले गेले आहे. यातील काही जाहिराती तर अशा होत्या, ज्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेच, पण सोबतच वादही उभे ठाकले होते. आता पुन्हा पूजाला 30 वर्षांनंतर आपली अशीच एक जाहिरात आठवली आहे. तिने सन 1991 मध्ये कंडोमची जाहिरात केली होती, जी चांगलीच वादात सापडली होती. आता ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पूजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजा मार्क रॉबिन्सनसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत पूजाने ‘बापरे! सन 1991 मध्ये कामसूत्र कंडोमसाठी प्रबुद्ध दास गुप्ताने माझे काही शानदार फोटो घेतले होते.’ यासोबतच तिने कॅप्शनमध्ये गौतम सिंघानिया यांनाही टॅग केले आहे.

पूजा आणि मार्क यांनी ही जाहिरात एका कंडोम कंपनीसाठी केली होती. सन 1991 मध्ये ही जाहिरात खूपच बोल्ड असल्याचे सांगत दूरदर्शनवर बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पूजाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत. काही सोशल मीडिया युजर्स पूजाची भलतीच प्रशंसा करत आहेत, तर काही युजर्सना तिचे फोटो खटकले आहेत.

या ऍडबाबत तिने एकदा म्हटले होते की, “ज्याप्रकारे हे फोटोशूट करण्यात आले होते, ते खूपच आश्चर्यकारक आणि प्रभावी ठरले होते. आम्ही या जाहिरातीची शूटिंग गोव्यात केली होती. जेव्हा मी ही जाहिरात साईन केली, तेव्हा मला वाटले की, मला शॉवरमध्ये राहावे लागेल आणि मार्क रॉबिन्सन नावेत बसला असेल. मला हे सर्व करण्यात काही अडचण नव्हती. परंतु जेव्हा मी स्टुडिओमध्ये पोहोचले, तेव्हा मी पाहिले की, मार्क आधीपासूनच तिथे उपस्थित होता.”

“त्यावेळी मी विचारले की, स्टुडिओमध्ये काय करत आहे? त्यानंतर मला समजले की, या जाहिरातीमध्ये त्याला माझ्यासोबत शॉवर घेताना दाखवण्यात येणार होते. मला मार्कवर हँड शॉवरचा वापर करायचा आहे आणि त्यावेळी मला पूर्णपणे आश्चर्याचा धक्का बसला होता. तरीही मला ते करण्यात कोणतीही अडचण नव्हती,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली होती.

तसं पाहिलं तर पूजाची ही कंडोम जाहिरात एकमेव नव्हती, ज्यामुळे वाद उभा राहिला होता. याव्यतिरिक्त अनेक जाहिराती अशा होत्या, ज्यांच्यामुळे वादविवाद झाले आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.(bollywood actress pooja bedi share her photoshoot for a condom brand in 1991 says these are my wow photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची संजय राउतांनाही भुरळ, व्हायरल व्हिडिओ शेअर करत म्हणाले, वेड…

उर्फीने 2 पीस बिकिनीमध्ये केले बोल्ड फोटोशूट; युजर्स म्हणाले, ‘प्लंबर आउटफिट’

हे देखील वाचा