Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड बाबाे! असे काय घडले की, प्रियांका म्हणाली, ‘फक्त घरी येणे…’

बाबाे! असे काय घडले की, प्रियांका म्हणाली, ‘फक्त घरी येणे…’

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारत दौऱ्यावर आहे. खूप दिवसांनी घरी आल्याने प्रियांकाला खूप आनंद झाला आहे आणि ती इथे प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. कामासोबतच ती वृद्धांनाही भेटत आहे. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चाहत्यांना भेटताना दिसत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून तिने चाहत्याविषयीचे फाेन व्यक्त केले.

फॅशन ब्रँडच्या प्रमोशनसाठी प्रियांका पोहोचली मुंबईत
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) खूप दिवसांपासून भारतात आली नव्हती. अशा परिस्थितीत, जेव्हा ती खूप दिवसांनी आली आहे, तेव्हा हे क्षण प्रियांकासाठी खूप खास आहेत. प्रियांकाचे चाहते तिला मिस करत आहेत आणि तिला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच प्रियांका एका फॅशन ब्रँडच्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचली आणि ती वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकासाठी चाहत्यांच प्रेम आहे म्हत्वाच?
प्रियांका चाेप्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिच्यासाठी सर्वात रोमांचक गोष्ट कोणती आहे? यावर ती म्हणाली, “अनेक गोष्टी आहेत, पण चाहत्यांना भेटणे सर्वात जास्त उत्साही आहे.” ती तिच्या चाहत्यांना म्हणाली, “फक्त घरी येणे हे सर्व काही आहे आणि तुम्हा सर्वांना भेटणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हा लोकांचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”

Priyanka
photo courtesy instagrampriyankachopra

पीसीने चाहत्यांना टी-शर्ट दिले भेट
प्रियांकाला पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित दिसले. पीसीने त्याच्या चाहत्यांना टी-शर्टही भेट दिले. प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर फोटोही शेअर केले आहेत. प्रियांका चोप्रा लवकरच आलिया भट्ट (alia bhatt) आणि कॅटरिना कैफ (katrina kaif) हिच्यासाेबत एक चित्रपट करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल

धक्कादायक! वरुणने ढसाढसा रडत व्यक्त केलं दु: ख; अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना

हे देखील वाचा