अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरजचे दोन भाग स्ट्रीम हाेत आहे. याशिवाय, दर शुक्रवारी एक नवीन भाग स्ट्रीम केला जाईल. अशा प्रकारे, 26 मे 2023 पर्यंत, संपूर्ण सीरिज ओटीटी वर स्ट्रीम हाेणार आहे. कामाव्यतिरिक्त प्रियांका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्राने गेल्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून लेक मालतीचे स्वागत केले. अशात अलीकडेच प्रियांका चोप्राने एग फ्रीजच्या प्रक्रियेबद्दल सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) करिअर शिवाय इतर सर्व मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलत असते. यापूर्वी तिने बॉलिवूडमधील भेदभावावर मौन साेडले होते. अशातच आता ती आपले एग फ्रीज करण्याच्या निर्णयावर बाेलली. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये प्रियांका चोप्रा हिने याविषयी बाेलताना सांगितेल की, ‘एग फ्रीज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खूप वेदनादायक आणि गुंतागुंतीची आहे.’
View this post on Instagram
प्रियांका चोप्राने सांगितले की, ‘वयाच्या 30व्या वर्षी तिने एग फ्रीज करण्याचा निर्णय घेतला.’ अभिनेत्रीने सांगितले की, ‘त्यावेळी ती क्वांटिकोमध्ये व्यस्त होती.’ प्रियंका पुढे म्हणाली, ‘ही प्रक्रिया खूप वेदनादायक आहे. साधरणता महिनाभर इंजेक्शन्स घ्यावे लागतात. एवढेच नाही, तर औषधेही घ्यावी लागतात, त्यामुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होत राहतात आणि यामुळे तुम्हाला सूज देखील येऊ शकते.’
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, ‘या सर्व गुंतागुंतीनंतरही, ही प्रक्रिया त्या महिलांसाठी खूपच चांगली आहे, ज्यांना काही कारणास्तव 30व्या वर्षी आई व्हायचे नाही. ही प्रक्रिया खूप महाग आहे, त्यामुळे यासाठी बचत देखील आवश्यक आहे.(bollywood actress priyanka chopra opens up on freezing her eggs in early 30s says process was painful)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंगच्या ट्विटर अकाऊंटच्या ब्लु टिकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या माजी ट्विटर इंडिया प्रमुखाला फॅन्सने केले ट्रोल
काश्मीर फाइल्सला पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज अनुपम खेर यांचा फिल्मफेयर निशाणा म्हणाले, ‘इज्जत महाग गोष्ट…’