अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल‘ या सीरिजमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत मुंबईत आली होती. यादरम्यान तिने काही मुलाखतीही दिल्या. जिथे तिने ग्लोबल स्टार बनण्याचा संघर्ष आणि आपला देश सोडून परदेशात स्थायिक होण्याच्या अडचणींबद्दल सांगितले.
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) हिने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ती सर्व कलाकरांना भेटण्याची इच्छा ठेवते. जे कलाकार परदेशात येतात त्यांची मदत करायला तिला आवडते.’ प्रियंका म्हणाली, “मला फोन येतात आणि माझी इच्छा आहे की, मला असेच फाेन येत राहावेत. तुम्ही काेणालाही ओळखत नाही, तुम्ही सेटवर जाता, काम करता, घरी येता आणि मग काय? भिंती खायला उठतात.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझी कम्युनिटी सोडून, माझे अन्न सोडून, माझे कुटुंब सोडून, माझे मित्र सोडून तिथे जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते.”
View this post on Instagram
बॉलीवूडमधील तिच्या मैत्रिणींबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की, माझे जे घर आहे ते इंडस्ट्रीतील लाेकांसाठी आहे. की, पाहा आमची मुलगी आहे तिथे.”
View this post on Instagram
गेल्या महिन्यात राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी प्रियंका चोप्राला तिच्या लॉस एंजेलिस येथील घरी भेटायला गेले होते. यापूर्वी देसी गर्लने प्रिती झिंटा आणि तिचा नवरा जीन गुडइनफ यांनाही आमंत्रित केले होते. प्रियांका चोप्राने 2023च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री, छेलो शोच्या टीमसाठी तिच्या घरी डिनरचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी त्यांच्या घरी फिल्मचे स्क्रिनिंगही ठेवले होते.(bollywood actress priyanka chopra talk about her difficulties settling in los angeles and leaving india )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेट्रो मूड ऑन करणारे ‘फकाट’मधील “तुझी माझी जोडी” प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला
सलमान खान का घालताे फाटलेले बूट? ‘या’ कलाकारांनी केला धक्कादायक खुलासा, वाचा संपुर्ण प्रकरण