Friday, July 5, 2024

शाही घराण्यातील असूनही आजही अविवाहित आहे रायमा‌ सेन, बोल्डनेसने नेहमीच करते सगळ्यांच्या बत्त्या गुल

अभिनेत्री रायमा सेन ही तिच्या सौंदर्यामुळे मागील दोन दशकांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन सेन्सने ती सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. यासोबत चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे ती नेहमीच कौतुकास पात्र ठरते. रायमा ही मुनमुन सेन आणि भरत देव वर्मा यांची मुलगी आहे. ती  मंगळवारी (७ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया रायमाबाबत काही खास गोष्टी.

रायमा सेनचा जन्म ७ नोव्हेंबर १९७९ रोजी कोलकत्तामध्ये झाला. हिंदी इंडस्ट्रीमधील ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिची आजी सुचित्रा सेन ही बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होती. रायमाची बहिण रिया सेन देखील अभिनेत्री आहे. त्यामुळे घरात लहानपणापासून अभिनयाचे धडे गिरवले जात होते. तसेच ती एका शाही घरण्यातील आहे. (Bollywood actress Raima Sen birthday special : let’s know some unknown fact about her)

रायमा ही अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुरामधील शाही घराण्यातील आहे. तसेच तिची आजी देवी कूच बिहारची राजकुमारी होतो. एवढंच नाही तर तिची लहान बहीण गायत्री देवी जयपुरची महाराणी आहे. तिच्या आई-वडिलांच्या ती अगदी जवळ आहे. माध्यमांशी बोलताना तिने एकदा सांगितले होते की, तिच्या आई वडिलांवर तिचे खूप प्रेम आहे.

 

अजूनही रायमा अविवाहित आहे. तिने माध्यमांशी बातचीत करताना सांगितले होते की, “ती आयुष्यात एका चांगल्या व्यक्तीची वाट बघत आहे. योग्य वेळ आल्यावर ती लग्न करणार आहे. पण सध्या ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे.

तिने एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, “जर मला कोणी असा भेटला, ज्याला भेटल्यावर मी त्याच्या प्रेमात अगदी वेडी होईल त्याच्याशीच लग्न करण्याचा मी निर्णय घेईल.” लग्नाबाबत तिचे असे मत आहे की, लग्न करणे जास्त गरजेचे नाही बिना लग्नाची देखील ती खुश राहू शकते.

तिचे असे म्हणणे आहे की, लग्न न करणे ही गोष्ट माणसाला जगण्यात मोकळीक देते. त्यामुळे ती कुठेही फिरू शकते. लग्न केले नाही म्हणून ती सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे. तिने ‘गॉडमदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दामण’ या चित्रपटात तिने रवीना टंडन हिच्या मुलीचे पात्र निभावले होते. यासोबत तिने ‘चोखेरवाली’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. सोबतच अनेक वेबसीरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

हेही नक्की वाचा-
तब्बल सात वर्षानंतर का तुटले ऋत्विक आणि आशाचे नाते? ऋत्विकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कारण
वयाच्या १४ वर्षीच पडली होती आमिर खानच्या प्रेमात, पहिल्या चित्रपटात किरणला मिळाले खरे प्रेम

हे देखील वाचा