सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणीही सहज व्यक्त होत असतो. आपल्या आयुष्यातील चांगल्या- वाईट घटनांचा येथे खुलासा करत असतो. त्यात कलाकारांचं तर काय बोलायलाच नको. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटाचा अपडेट ते सोशल मीडियावर देत असतात. अभिनेत्री रायमा सेन देखील या बाबतीत मागे नाहीये. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर कहर करत आहेत. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. सध्या तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून रायमाने तिचा अनुभव सांगितला आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, हे फोटो तिने अगदी सहज काढले आहेत. तिने खुलासा केला आहे की, तिने हे फोटोशूट तिच्या बिल्डिंगच्या टेरेसवर केले आहे. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हे फोटोशूट करताना मी खूप कंफर्टेबल होते. कम ऑन ते काही बोल्ड नाहीत. त्यात मी काही लाजाळू व्यक्ती नाहीये.”
https://www.instagram.com/p/CPItP9lrbJ0/?utm_source=ig_web_copy_link
रायमा सध्या कोलकत्तामध्ये आहे. तिने सांगितले की, “16 मेला लॉकडाऊन सुरू झाले आणि आम्ही हे फोटोशूट 15 मेला केले आहे.” चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये तिच्या नॉन ग्लॅमरस रोलवर तिने सांगितले की, मी ज्या प्रकारचे काम करते त्यात मी खुश असते.”
https://www.instagram.com/p/CPH-Z9Frzj6/?utm_source=ig_web_copy_link
रायमाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिची ‘लास्ट ओवर’ ही वेब सीरिज ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये ती एका आईच्या रुपात आहे. या सीरिजमध्ये संजय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. बंगाली चित्रपट सोबत ती वेब सीरिजमध्ये देखील खूप व्यस्त आहे.
https://www.instagram.com/p/CPGXEg-rS6t/?utm_source=ig_web_copy_link
झी5 वर तिने ‘परछाई’, ‘लव्ह बाईट्स’, ‘ब्लॅक विडोज’,’फॉरबिडन लव्ह’, या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने ‘चोखेरबाली’, ‘फंटूश’,’परिनिता’, ‘दस’, ‘अंडर’, ‘तीन पत्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…