Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूडच्या पाच सदाबहार अभिनेत्री आज दिसतात ‘अशा’, एक तर ओळखणेही कठीण

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूडच्या पाच सदाबहार अभिनेत्री आज दिसतात ‘अशा’, एक तर ओळखणेही कठीण

‘ग्लॅमरस’ हा शब्द उच्चारताच तोंडात नाव येते, ते म्हणजे बॉलिवूड. या बॉलिवूड जगताकडे परीक्षक म्हणून बघताना,  आपल्याला बरंच काही बघायला मिळत असते. नवीन काहीतरी शिकवून जाणारा चित्रपट, त्या चित्रपटातील एखादी  घडलेली महत्त्वाची गोष्ट असं बरंच काही बघायला मिळते. पण हे सगळंच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, ते त्या चित्रपटातील कलाकार. चित्रपटामध्ये नायिकेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. त्यांच्याशिवाय चित्रपट आजही अपूर्णच आहे, असे म्हणता येईल.

आजवर या बॉलिवूड जगात कितीतरी अभिनेत्री होऊन गेल्या की, ज्यांनी आपल्या उत्त्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, आणि कायमसाठी त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या. या अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या की, त्यांची एक झलक बघण्यासाठी चित्रपटगृह तुडुंब भरायचे. हिंदी सिनेमाच्या या अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्य क्षेत्रात खूप नाव कमावले, परंतु काळानुसार त्यांचे सौंदर्य आणि परिस्थिती दोन्ही बदलल्या. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया…

तनुजा
तनुजा त्यांच्या काळातील सुपरहिट अभिनेत्री होत्या. त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. त्या दिवसांत त्यांच्या सौंदर्याची बरीच चर्चा व्हायची. तनुजांचे काही अविस्मरणीय चित्रपट लोकांच्या मनात अजूनही आहेत. ज्यात ‘छबीली’, ‘बहारे फिर आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’, ‘मेरे जीवन साथी’, ‘अमीर-गरीब’, ‘याराना’, ‘महिवाल’, ‘रखवाला’, ‘साथिया’, ‘खाकी’, ‘सन ऑफ सरदार’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. तनुजा या अभिनेत्री काजोलची आई आहे, आणि आजही त्यांच्या काळातील सुंदर अशा तनुजांच्या चाहत्यांची कमतरता नाही.

वहीदा रहमान
चित्रपट जगतात उत्तम अभिनय करून लोकांचे मन जिंकणाऱ्या अभिनेत्री वहीदा रहमान. ५०, ६० आणि ७० च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री तर होत्याच, परंतु त्या काळची त्यांची अजून एक ओळख म्हणजे, त्या एक उत्तम नृत्यांगना होत्या. सुपरस्टार देवानंद त्यांच्यासोबत त्यांनी ‘गाईड’ चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘प्यासा’, ‘सीआयडी’, ‘सोहलवा साल’, ‘कागज के फूल’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘पत्थर के सनम’, ‘राम और शाम’ और ‘नमक हलाल’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

वैजयंतीमाला
अभिनेत्री वैजयंतीमाला त्यांच्या काळातील सुपरस्टार अभिनेत्री होत्या. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी चित्रपट जगात प्रवेश केला. ‘नागिन’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘कठपुतली’, ‘मधुमती’, ‘गंगा जमुना’, ‘संगम’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील चाहत्यांची मने जिंकली.

आशा पारेख
आशा पारेख या आजही बर्‍याचदा चर्चेत असतात. आशा पारेख या त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होत्या, आणि त्यांच्या सौंदर्याची सगळीकडे बरीच चर्चा व्हायची. आशा पारेख या १९९४ ते २००१ पर्यंत सिने आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष आणि मध्यवर्ती सेन्सॉर बोर्डाच्या पहिल्या महिला सभापती होत्या. आशा यांचे लग्न झाले नाही. लग्नाविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘जर मी लग्न केले असते, तर आज मी जितके करु शकले आहे, त्यापेक्षा निम्म्या गोष्टी मला करता आल्या नसत्या.’ आशा पारेख यांच्या चित्रपटांबद्दल बोलताना त्यांनी ‘आसमान’, ‘बाप-बेटी’, ‘दिल देके देखो’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘आए दिन बहार के और आया सावन झूम के’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात आपली अदाकारी दाखवली.

राखी गुलजार
या यादीत अभिनेत्री राखी गुलजार यांचेही नाव आहे. राखी या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत, आणि त्यांनी बर्‍याच चित्रपटात आईची दमदार भूमिका केली आहे. त्यांनी ७०, ८०च्या दशकात ‘दाग’, ‘कभी कभी’ आणि ‘कसमें वादें’ या सुपरहिट चित्रपटांसह एक से एक हिट चित्रपट दिले. २००३ नंतर त्या चित्रपटाच्या पडद्यावर दिसल्या नाही, आणि त्या प्रसिद्धीपासून दूर गेल्या.

राखी गुलजार या गीतकार गुलजार यांच्या पत्नी आहेत. राखी त्यांच्या काळातील एक सुंदर अभिनेत्री होत्या. पण त्यांना आज ओळखणे कठीण झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कष्टाचं चीज झालं! अक्षयपासून ते जॅकलिनपर्यंत बॉलिवूड कलाकार करायचे ‘हे’ काम, कोणी होतं कंडक्टर, तर कोणी टॅक्सी ड्रायव्हर

-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या सुचित्रा सेन, लग्नाच्या ५ वर्षांनंतर ठेवले होते सिनेमात पाऊल

-जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जयाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर मारली होती रेखाला कानाखाली, बघतच राहिले होते सर्वजण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा