Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड कंट्रोवर्शियल क्वीनच्या मदतील स्वत: अंबानी आले धावून; अभिनेत्री म्हणाली…

कंट्रोवर्शियल क्वीनच्या मदतील स्वत: अंबानी आले धावून; अभिनेत्री म्हणाली…

कंट्रोवर्शियल क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानी आपले लग्न स्वीकारत नसल्यामुळे ती नाराज होती. अशात आता आदिलने लग्नाला होकार दिला आहे आणि लग्न झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, तिच्यावर पुन्हा एकदा संकटांचा डाेंगर काेसळला आहे. ताे म्हणजे राखीच्या आईची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे ती नाराज आहे.

राखी सावंत (rakhi sawant) हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करून तिची आई जया भेडा यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. अभिनेत्रीच्या आईला ब्रेन ट्युमरसोबतच कॅन्सरचाही त्रास आहे. अशातच आता अभिनेत्रीचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने अंबानी तिला मदत करत असल्याचे सांगितले आहे.

साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असलेल्या या व्हिडिओमध्ये राखी म्हणाली, “मला अंबानी जींचे आभार मानायचे आहेत. कारण, उपचारादरम्यान लागनारा खर्च खूप जास्त आहे. अंबानीजी यांनी मदतील हात पुढे करुन प्राइज मनी कमी केली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीने केला हाॅस्पिटलमधील रडतानाचा व्हिडिओ व्हायरल
राखीने सांगितले की, ‘तिच्या आईची प्रकृती खूप वाईट आहे. तिची आई तिला ओळखूही शकत नाही.’ यापूर्वी राखीने सांगितले होते की, ‘तिच्या आईच्या शरीराची डावी बाजू पॅरालाइज झाली आहे.’ बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यावर तिला तिच्या आईची अवस्था कळली. यानंतर राखीने हॉस्पिटलमधील रडतानाचा व्हिडिओ शेअर केला हाेता.

राखी सावंत फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी धुवायची भांडी?
राखी सावंतबद्दल हे खूप प्रसिद्ध आहे की, फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिने अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात जेवण वाढले होते. मात्र, तेव्हा तिने हे सर्व पैशासाठी केले हाेते. अभिनेत्रीने त्यांच्या लग्नात भांडीही धुतली.(bollywood actress rakhi sawant says ambani helping to lower the price money for treatment of her mother)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मीडियाचे कॅमेरे बघताच चढला जया बच्चन यांचा पारा म्हणाल्या, ‘नोकरीवरून काढा…’

कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

हे देखील वाचा