बॉलिवूडमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवावी असे अनेक तरुण मुलींना वाटते. पण या क्षेत्रातील ग्लॅमरमागे किती कठोर परिश्रम दडलेले आहे, याची मात्र कोणालाच जाणीव नाहीये. तरुणींना बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले आहेत. तसेच तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगाना तोंड देत ती कशी या इंडस्ट्रीमध्ये तग धरून राहिली, हे देखील सांगितले आहे.
राणी मुखर्जीला तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला या येत्या ऑक्टोबरमध्ये 25 वर्ष पूर्ण होतील. खरं तर राणी मुखर्जी कधी कोणाला सल्ला देत नाही. पण बॉलिवूडमध्ये येऊन अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक छोट्या शहरातून आणि गावाकडून आलेल्या मुलींना तिने सल्ला दिला आहे. तिच्या करिअरमधील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
याबाबत बोलताना राणी मुखर्जीने सांगितले की, “मला फक्त एवढंच म्हणायचे आहे की, बॉलिवूडमधील ग्लॅमरला भाळू नका. त्याच्यापलीकडे या क्षेत्रात खूप मेहनत करावी लागते. त्यासोबतच मॉडेल बनणे तर त्याहून आणखी अवघड, कारण आपण जेव्हा स्टार बनतो तेव्हा लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा खूप वाढतात. आपल्याला वेगवेगळ्या भागातील परिस्थितीला आणि वेगवेगळ्या मानसिकतेला सामोरे जावे लागते. आणि हे सगळं पार करून आपल स्वप्न पूर्ण करणे खूप अवघड गोष्ट आहे.”
पुढे तिने सांगितले की, “मी असं नाही म्हणत की तुम्ही या क्षेत्रात येऊ नका पण या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊनच प्रवेश करा. जर तुमच्यामध्ये काम करण्याची, मेहनत घेण्याची आणि जोखीम उठवण्याची तयारी असेल, तर तुम्ही खुशाल या. पण फक्त ग्लॅमर दिसत असेल, तर त्या ग्लॅमरच्या नादाने तुम्ही अगदी रसातळाला जाऊ शकता. पण जर तुमच्यात ती आग असेल तर नक्की या.”
राणी मुखर्जीने 18 ऑक्टोंबर, 1997 रोजी ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटानंतर तिच्यात अभिनेत्रीसारखी कोणतीच गोष्ट नाहीये असं सर्वत्र बोलले जात होते. तिचा घोगरा आवाज आणि कमी उंची यामुळे तिला सगळेजण बोलत असे. पण पंकज शुक्ला यांनी तिला सांगितले होते की, “ज्या आवाजामुळे आज तुला सगळे नाकारत आहेत. उद्या जाऊन तोच आवाज तुझी ओळख होणार आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडला कोरोनाचं ग्रहण! आज पुन्हा एक प्रसिद्ध अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात; चाहते चिंतेत
-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल