Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड VIDEO: रिया चक्रवर्तीचे बिघडले संतुलन, तोंडघशी पडता पडता वाचली

VIDEO: रिया चक्रवर्तीचे बिघडले संतुलन, तोंडघशी पडता पडता वाचली

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हळूहळू तिच्या आयुष्याच्या ट्रॅकवर परतत आहे. ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याशिवाय ती बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्येही दिसते.

अशातच रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती कारमधून उतरल्यानंतर वेगाने चालत आहे. यादरम्यान, अचानक अभिनेत्रीचा तोल बिघडताे आणि ती खाली पडता – पडता वाचते.

रिया चक्रवर्ती मंगळवारी (दि. 17 जानेवरी)ला सकाळी मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली. यादरम्यान, मीडिया फोटोग्राफरने अभिनेत्रीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. व्हिडिओमध्ये रिया तिच्या कारमधून बाहेर पडते आणि एका दुकानाकडे वेगाने चालते. त्यादरम्यान ती अडखळते आणि तिचा तोल गमावते. अशा परिस्थितीत रिया पाठीमागून येणाऱ्या फोटोग्राफरला सांगते की, “तुम्ही लोक फॉलो केल्यास असेच होईल.” असे बोलून ती तिथून निघून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ पॅपराझीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अशा परिस्थितीत युजर्स रियाला प्रचंड ट्रोल करत आहेत. एकाने लिहिलं, “तू एवढी घसरलीये की, आणखी किती पडायचं आहे.” तर दुसर्‍याने लिहिले, “कोणीतरी मागे आले म्हणून नाही पडली तर, सुशांत सिंगची हत्या केल्यानं आमची बद्दुआ लागली म्हणून पडली.”

rhea-chakraborty
Photo Courtesy Instagram

रिया चक्रवर्ती हिच्या विषयी बाेलायचे झाले तर, ती सध्या बंटी सजदेहला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या वृत्तांवर अद्याप अभिनेत्रीची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत होते, ज्यावरून रिया बंटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. काही काळापूर्वी रिया आणि बंटीची बहीण सीमा सजदेह एकाच कारमध्ये दिसले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्या खऱ्या मानल्या जाऊ लागल्या.(bollywood actress rhea chakraborty suddenly lost her balance see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! ऐश्वर्या रायच्या अडचणी वाढल्या, नाशिक तहसिल अधिकाऱ्याकडून मिळाली नोटिस

‘…अविस्मरणीय प्रवास थांबला…’ म्हणत अभिनेता ‘मुलगी झाली हो’ फेम योगेश सोहोनीने शेअर केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा