Friday, July 5, 2024

‘हिरोपंती’ फेम अभिनेत्री संदीपा धरने धरला ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

बॉलिवूड अभिनेत्री संदीपा धर अभिनयासोबतच, तिच्या उत्कृष्ट डान्ससाठीही ओळखली जाते. तिचे डान्स व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. संदीपा धरने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘बीबा’ गाण्यावर जोरदार नाचत आहे. संदीपाचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे. तिने हा डान्स व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, संदीपा धर वेगवेगळ्या ड्रेसमध्ये एकाच गाण्यावर डान्स करत आहे. नेहमीप्रमाणे तिचा हा डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. तिने हा डान्स व्हिडिओ हॅशटॅग बीट्स ऑफ बीबा चॅलेंजच्या अंतर्गत बनवला आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, चाहते यावर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.

याव्यतिरिक्त, संदीपा धर लवकरच ओरिजिनल सीरिज ‘बिसात’ मध्ये दिसणार आहे. संदीपा धरने तिच्या कारकीर्दीची सुरूवात 2010 मध्ये, राजश्री प्रॉडक्शनच्या ‘इसी लाईफ में’ या चित्रपटापासून केली होती. संदीपासोबत अशोक ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी बरेच कौतुक केले. याशिवाय तिला या चित्रपटासाठी स्टारडस्ट, फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड्स ही नामांकनेही मिळाली.

यानंतर ती सलमान खान अभिनित ‘दबंग 2’ या चित्रपटात दिसली. टायगर श्रॉफने पदार्पण केलेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटामध्येही संदीपाने काम केले आहे. यात तिने क्रिती सेननच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ

-‘बेस्ट रिटर्न गिफ्ट भावा…’, नेहा कक्करने भाऊ टोनी आणि पती रोहनप्रीतसोबतचा ‘या’ गाण्यावरील व्हिडिओ केला शेअर

-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा