Saturday, June 29, 2024

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये साराने केला डेब्यू, रेड कार्पेटवर ब्राइडल लूकमध्ये दिसली अभिनेत्री

76वा कान फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. अशात मंगळवारी (दि. 16 मे)ला फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर दिग्गज कलाकरांनी आपला जलवा दाखवला. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या सौंदर्यवतींनीही आपल्या सौंदर्यने सर्वांचे लक्ष वेधले. अशात सारा अली खानने पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. यावेळी अभिनेत्रीने ब्राईडल लूक केला हाेता, जाे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विदेशी रेड कार्पेटवर सारा अली खान (sara ali khan) हिने भारतीय संस्कृतीची झलक दाखवली. यावेळी अभिनेत्रीने अबू जानीने डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. अशात सारा आइवरी क्रीम कलरच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे, यासाेबतच आपाला लूक पुर्ण करण्यासाठी साराने मॅचिंग झुमके आणि हातात डायमंड ब्रेसलेट घातले हाेते. यावेळी अभिनेत्रीने केलेले कमीत कमी मेकअप तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घालत हाेते. अभिनेत्रीचा हा ब्रायडल लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

अभिनेत्रीच्या फाेटाेंवर चाहते सतत काैतुकाचा वर्षाव करत आहेत. अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, बाॅलिवूडचा सर्वात सुंदर लूक.’, तर एकाने कमेंट करत लिहिले की, ‘आम्हाला तुझा अभिमान आहे सारा’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मंडळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे ते 27 मे या कालावधीत चालणार आहे. यादरम्यान हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या कार्यक्रमाची तिकिटांची किंमत 5 ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे.

सारा अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती आदित्य राॅय कपूरसाेबत ‘मेट्रो इन दिन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटातही दिसणार आहे. ( bollywood actress sara ali khan debuts at the cannes film festival seen in a bridal look on the red carp)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेनिफर मिस्त्री कास्टिंग काऊच देखील झाली होती शिकार, व्हिडिओ पोस्ट करत केला खुलासा
दिलासादायक! चित्रपटगृहांना वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणे सक्तीचे अन्यथा…,राज्य सरकारचा मोठा निर्णय

हे देखील वाचा