Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

सारा अली खान प्रचंड बर्फवृष्टीत पोहोचली भगवान शिवाच्या दर्शनासाठी केदारनाथला, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिला प्रवास करण्याची खूप आवड आहे, जेव्हाही सारा तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमधून फ्रि होते, तेव्हा ती मित्रांसोबत बाहेर जाते. अशात यावेळीही असेच काहीसे घडले. नुकतीच सारा भगवान शंकराच्या दर्शनासाठी केदारनाथला पोहोचली होती. सध्या अभिनेत्री मुंबईत परतली असली तरी, अभिनेत्रीने बुधवारी (दि. 10 मे)ला तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसह फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सारा अली खान (sara ali khan) प्रचंड बर्फवृष्टीदरम्यान केदारनाथ धामला भेट देताना दिसत आहे. सारा अली खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात याच ठिकाणी आणि याच नावाने केली होती. खरे तर, अभिनेत्रीचा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’ नावाचा असून चित्रपटाचे शूटिंग केदारनाथला झाले. यादरम्यान अभिनेत्री पुर्ण 2 महिने केदारनाथला राहिली.

या फोटोमध्ये सारा अली खान केदारनाथ धामला भेट देताना दिसत आहे. अभिनेत्री शीलावर बसून प्रार्थना करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने लाल रंगाची शाल देखील परिधान केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

फोटो शेअर करताना साराने हार्ट ईमाेजीही शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी पहिल्यांदा या ठिकाणी आले, तेव्हा मी कॅमेराचा सामनाही केला नव्हता आणि आज मी त्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आज मी जे आहे त्याबद्दल आणि मला हे सर्व दिल्याबद्दल केदारनाथचे आभार.”

साराच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो इन दिन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अभिनेत्री विक्की कौशलसोबत ‘लुका छुपी 2’, ‘ए वतन मेरे वतन’मध्येही दिसणार आहे.(bollywood actress sara ali khan reached kedarnath to visit lord shiva in heavy snowfall)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चित्रपटाचे भविष्य तुम्ही ठरवू शकत नाही…’, म्हणत सीबीएफसी सदस्याने ममता बॅनर्जीच्या विरुद्धात मांडले मत

खलनायकी भूमिकांमधून छाप पडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला लग्नाच्या ३० वर्षांनंतरही नाही मुलंबाळं, तरीही आनंदात जगते आयुष्य

हे देखील वाचा