Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनदरम्यान शायरी बोलल्यामुळे सारा झाली ट्रोल, ‘अशी’ हाेती विकीची अवस्था

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी काैशल सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलेच व्यस्त आहेत. अशात दोघेही चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी राजस्थानला गेले असून तेथील स्थानिकांशी संवाद साधताना दिसले. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे साराला चांगलेच ट्रोल केले जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सारा अली खान (sara ali khan) आणि विकी कौशल (vicky kaushal) यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजस्थानची निवड केली. अशात त्यांच्या राजस्थान दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. मात्र, यादरम्यान सारा एका व्हिडिओमध्ये शायरी म्हणताना दिसली, ज्यामुळे नेटिझन्सचा राग अनावर झाला आहे.

या व्हिडिओमध्ये सारा जयपूरमधील एका स्थानिक दुकानात खरेदी करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, शॉपिंग करताना साराने एक शायरी ऐकवली, जी नेटिझन्सना अजिबात आवडली नाही. अभिनेत्री म्हणाली,’नमस्ते दर्शकों, जैसा कि आप देख सकते हैं, हम हैं जयपुर में लुकिंग एट दुपट्टा, शॉपिंग और मूवी देखना विद परिवार इकट्ठा, स्पेशली इफ यू आर शॉपिंग विद श्री हट्टा गट्टा।’ तिची ही शायरी ऐकल्यानंतर विकी कौशल दुपट्ट्याने चेहरा झाकताना दिसला.

अशात सारा अली खानच्या शायरीमुळे नेटिझन्स नाराज झाले आणि अभिनेत्रीला ट्राेल करू लागले. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘यार साराला हे थांबवावे लागेल. हे खरोखर मजेदार नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

याआधी सारा अली खान आणि विकी कौशल यांनी प्रमोशनसाठी राजस्थानमधील 170 सदस्यांच्या जॉइंट फॅमिलीची भेटही घेतली होती. या भेटीत दोघांनी तिथल्या जेवणाचा आस्वाद घेत फोटोही काढले. ‘जरा हटके जरा बचके’ बद्दल बोलायचे झाले, तर लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून 2 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.(bollywood actress sara ali khan trolled for her shayari during promotions in jaipur with vicky kaushal )

हे देखील वाचा