Wednesday, June 26, 2024

काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना खूप संघर्षानंतर यश मिळाले आहे. अनेकवेळा या कलाकारांना 30 – 40 वर्षे त्यांच्या चित्रपटात काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण त्यांना ओळख मिळत नाही. सीमा पाहवा देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटात ‘शैला मासी’ ही भूमिका केली होती. ही भूमिका त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीने केली की, प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या अभिनयाने एक वेगळी छाप उमटवली आहे. मात्र एक काळ असा होता की, कौशल्य असूनही त्यांना करिअरमध्ये बरीच वर्षे संघर्ष करावा लागला. परंतु त्यांच्या सावळ्या रंगामुळे नेहमीच त्यांना नकारांना सामोरे जावे लागले.

सीमा पाहवा यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांना मोठ्या संघर्षानंतर यश मिळाले. आज त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यासाठी त्यांना खूप वाट पाहावी लागली. क्षमता असूनही केवळ रंगामुळे काम न मिळाल्याने ही अभिनेत्री खूपच निराश झाली होती. त्यांचे कौशल्य पाहून बऱ्याच दिवसांनी निर्मात्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना  चित्रपटात काम द्यायला सुरुवात केली. आज त्यांच्या कामामुळे आणि नावामुळे त्यांना ओळखले जाते.

सीमा पाहवा यांनी लहान वयातच अभिनय विश्वात काम करायला सुरुवात केली होती. 5 वर्षांच्या असताना त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. आज त्या या क्षेत्रात आहे ते आईमुळेच असा त्यांचा विश्वास आहे.

आज निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये त्यांना कास्ट करतात. पण एक काळ असा होता की, सावळ्या असल्याने त्यांना काम मिळत नव्हते. मिळायच्या तर फक्त किरकोळ भूमिका. त्यामुळे त्या कदाचित स्वतःची ओळख कधीच बनवू शकल्या नसत्या.

एका मुलाखतीत सीमा पाहवा यांनी स्वतः सांगितले की, त्यांना टीव्ही आणि थिएटरमध्ये कधीही नकाराचा सामना करावा लागला नाही, पण बॉलीवूड हे त्यांच्यासाठी पूर्णपणे वेगळं जग होतं. जिथे त्यांना आपला ठसा उमटवण्यासाठी आणि नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

काही वर्षांपूर्वी जिथे बॉलीवूडमध्ये बनवले जाणारे चित्रपट हे मुळात फक्त उच्चवर्गीय लोकांसाठी असायचे, तिथे आता चित्रपटांमध्ये सर्व प्रकारची पात्रे लोकांसाठी आहेत. फिल्मी दुनियेत स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला.

 

मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा तुम्ही मोठ्या बजेटच्या चित्रपटात काम करता आणि त्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करता, तेव्हा खूप वेगळा बदल होतो. आपल्या इंडस्ट्रीत असा नियम आहे की, मोठ्या स्टार्सना मोठ्या हॉटेल्समध्ये आणि छोट्या स्टार्सना छोट्या हॉटेल्समध्ये ठेवले जाते. त्यामुळे असे वाटते की, आपल्याला काही किंमत नाही. (bollywood actress seema pahava most time reject beacuse her dark skin)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ फेम अभिनेता अर्शद वारसी याने शेअर केला लग्नाचा रंजक किस्सा म्हणाला, ‘कोल्ड ड्रिंकमध्ये बियर….,’
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’

हे देखील वाचा