Wednesday, July 3, 2024

उंट चालायला लागताच ‘अम्मा अम्मा’ ओरडायला लागली पंजाबची कॅटरिना, पाहा भन्नाट व्हिडिओ

पंजाबची कॅटरिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलच्या क्यूटनेसचे लाखो लोक वेडे आहेत. शहनाजचे चाहते तिची झलक पाहून खूप खूश होतात. शहनाजची निरागस शैली लोकांना खूप आकर्षित करते. शहनाजही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तिची झलक शेअर करत असते. शहनाज सध्या वाळवंटाच्या सहलीला गेली आहे. जिथले फाेटाे तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, जे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके या व्हिडिओमध्ये? चला बघूया…

शहनाजनेही वाळवंटात पोहोचल्यानंतर उंटाची सफर केली. मात्र, उंटावर बसताना शहनाज (shehnaaz gill) चांगलीच घाबरली. उंटाने पाऊल टाकताच शहनाज ‘अम्मा अम्मा’ ओरडायला लागली. शहनाजच्या या निरागस स्टाईलवर चाहतेही हसले. यासोबतच चाहत्यांनी शहनाजच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिलला पंजाबची कॅटरिना कैफ म्हणूनही ओळखले जाते. 1993 मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेल्या शहनाज गिलने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर शहनाजने अनेक पंजाबी गाण्यांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. यासोबतच शहनाजने पंजाबी चित्रपटांमध्येही तिच्या अभिनय कौशल्य सादर केले आहे. 2016 मध्ये शहनाजला ‘माझे दी जट्टी’ या गाण्याने चांगलीच ओळख मिळाली. यानंतर शहनाजने सरपंच, बर्बरी अशा काही गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे.

शहनाजला बिग बॉस-13 मधून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. या शाेमध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी  प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता शहनाजही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. शहनाज सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातही दिसणार आहे. शहनाज सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर शहनाजला 13 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.(bollywood actress shehnaaz gill gives adorably hilarious reaction as she ride camel in registan video viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चौकशीदरम्यान उर्फी जावेदनी नोंदवला जबाब; म्हणाली, ‘मला भारताच्या राज्य घटनेने…’

हुमा कुरेशीने केला थेट अनुराग कश्यपवरच चोरीचा आरोप; दिग्दर्शकाने दिले चोख प्रतिउत्तर

हे देखील वाचा