पंजाब इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली‘ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. शहनाज गिलच्या गोंडस अभिनयाचेही लाखो लोक वेडे आहेत. अशातच अलीकडे तिने तिच्या चॅट शोमध्ये तिच्या शाळेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. यावेळी काय बाेली अभिनेत्री? चला जाणून घेऊया….
शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने सांगितले की, “मी शाळेत खूप खाेडकर पणा करायचे. माझा आवडता पीरियड विज्ञान मधील रीप्राेडक्शन चाप्टर हाेता. या चाप्टरमध्ये मी खूप मजा करायचे.” शाळेतील दिवसांमधील खोड्या आठवून शहनाज गिल म्हणाली, “मला वर्गात खूप मजा यायची. मला विज्ञानातला तो विषय आवडायचा. वर्गात जेव्हा जेव्हा रीप्रोडक्शनचा धडा शिकवला जायचा तेव्हा मी खूप लक्षपूर्वक ऐकायचे. मी एकदा मॅडमला विचारले होते की, ‘मी हे प्रेक्टिकलही करू शकते का?’ यावर मॅडमनेही मला फटकारले.”
शहनाज गिल Desi Vibes With Shehnaaz Gill हा चॅट शाे हाेस्ट करते.या शोमध्ये शहनाज सेलिब्रिटींना बाेलवते आणि त्यांच्याशी संवाद साधते. शहनाज गिलने नुकतेच रकुलप्रीत सिंगला आमंत्रित केले होते. शोमध्ये पोहोचलेल्या रकुलप्रीत सिंगने तिच्या आगामी ‘छत्रीवाला’ या चित्रपटाचे प्रमोशन केले. यावेळी दोघांनीही शोमध्ये खूप धमाल केली आणि यासाेबतच लैंगिक शिक्षणाच्या महत्त्वावर चर्चा केली.
शहनाज गिलला पंजाबची कॅटरिना कैफ म्हणूनही ओळखले जाते. शहनाजने तिच्या करिअरची सुरुवात पंजाबी इंडस्ट्रीतून केली होती. येथे शहनाजने मॉडेलिंगसोबतच म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. यासोबतच शहनाजने अनेक गाण्यांना तिचा आवाजही दिला आहे. शहनाजला बिग बॉस 13 मधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. बिग बाॅसमध्ये शहनाजच्या क्यूट ऍक्ट्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि शहनाज स्टार बनली.(bollywood actress shehnaaz gill shared her school stories during the class of reproduction )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आथिया अन् राहुल यांच्या लग्न सोहळ्यत पाहुण्यांसोमोर ठेवल्या ‘या’ अटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
पांढऱ्या रंगाची साडी नेसून जान्हवी उतरली पाण्यात, फाेटाे बघताच युजर्सला आठवली ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी










