Saturday, July 6, 2024

शिल्पा शेट्टीने कुटुंबासाेबत साजरा केला हाेळीचा सण, पाेस्ट शेअर करत फॅन्सला दिला खास संदेश

आज म्हणजेच मंगळवारी (दि 7 मार्च) राेजी सर्वत्र हाेळी साजरी केली जात आहे. अशात काल म्हणजे शुक्रवारी 6 मार्चला सर्वत्र हाेलिका दहन करण्यात आले. मग यामध्ये बाॅलिवूडकर कसे मागे राहतील बरे…शिल्पा शेट्टीने 6 मार्चला होलिका दहन केले. त्याची एक झलक तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, जी साेशल मीडियावर समाेर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

शिल्पा शेट्टा (shilpa shetty) नेहमीच तिच्या संपूर्ण कुटुंबासह सण साजरा करते आणि चाहत्यांसाेबत त्याची झलक शेअर करते. गेल्या दिवशी देखील शिल्पाने इन्स्टा वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची दोन मुले, पती राज आणि आईसह होलिका दहन करताना दिसत आहे. अभिनेत्रीने मुलीला आपल्या हातात धरले आहे. यावेळी शिल्पाने लाल रंगाचा सूट परिधान केला असून ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही छोट्या नोट्स लिहिताे आणि आमच्या सर्व नकारात्मक भावना, ते प्रेम आणि प्रकाशाच्या रूपात विश्वात सोडतो.”

पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “हा एक विधी आहे जो आम्ही दरवर्षी होलिका दहनला करतो. हा सण आम्हांला आठवण करून देतो की, श्रद्धा आणि भक्तीने देव नेहमीच तुमचे रक्षण करतो आणि नकारात्मकतेची राख करून टाकाताे. तुमचे जीवन सकारात्मकतेच्या आणि प्रेमाच्या रंगांनी भरून टाका, ही होळी तुमच्साठी आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.”

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्या व्यतिरिक्त विवेक ओबेरॉय आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकरणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच फिमेल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.(bollywood actress shilpa shetty performed holika dahan 2023 with family share video on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहरेने पतीसह लुटला धुळवडीचा आनंद

हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे

हे देखील वाचा