Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हाेताेय छळ? वाचा काय आहे प्रकरण…

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या चाहत्यांना फिटनेसबद्दल जागरुक करत असते. मात्र, यादरम्यान शिल्पा तिच्या चाहत्यांना हसवण्याची एकहि संधी सोडत नाही, हे तिच्या शेअर केलेल्या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या ‘नवरा’ आणि ‘सासऱ्यांची’ समस्या तिच्या चाहत्यांना सांगितली आहे, तीही खूप मजेदार पद्धतीने.

शिल्पा(shilpa shetty) हिने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिहारी लाईनवर जबरदस्त लिपसिंक करत आहे. तिने डोक्यावर स्कार्फ घेतला आहे. व्हिडिओमध्ये एका पुरुषाचा आवाज येतो, “का हो, तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासरची समस्या का सांगत नाही.” हे करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘संडे रील.’

शिल्पाचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक युजरने तिच्या लिपसिंक आणि मजेदार शैलीची प्रशंसा केली आहे. शिल्पा शेट्टीच्या या फन स्टाइलचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुकही केले आहे, ज्यामध्ये तिची बहीण शमिता शेट्टीचाही समावेश आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

शिल्पाने नुकतेच तिच्या घरातील कंचक पूजेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये शिल्पाचा पती राज कुंद्रा घरात आलेल्या मुलींचे पाय धुताना आणि त्यांची पूजा करताना दिसला. या व्हिडिओमध्ये शिल्पाने तिची मुलगी शमिषाची झलकही दाखवली आहे. छोटी शमिशाही कंचकमध्ये सामील झाली होती, जिचे राज कुंद्रा पाय धुताना दिसले होते.

त्याच वेळी, तिने तिच्या व्यायामाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एथनिक वेअरमध्ये जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. शिल्पाने या व्हिडिओद्वारे नवरात्रीबद्दलचा उत्साह व्यक्त केला आणि व्यायामासाठी कोणत्याही प्रकारच्या कपड्यांची आवश्यकता नसून कोणत्याही पोशाखात व्यायाम कसा करता येतो हे सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

KILLER! नोराने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान
उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, ‘ऋषभ पंतचा पाठलाग…’

हे देखील वाचा