Monday, July 1, 2024

सुचित्रा सेन | एक चित्रपट फ्लॉप होताच सोडली इंडस्ट्री, तब्बल ३६ वर्षे स्वतःला खोलीत ठेवले कोंडून

‘तेरे बिना जिंदगी से कोई’, ‘रहे ना रहे हम मेहका करेंगे…’ ही गाणी आपल्याला अभिनेत्री सुचित्रा सेनची (Suchitra Sen) आठवण करून देतात. या त्या अभिनेत्री आहेत ज्यांनी ‘देवदास’, ‘आंधी’ सारखे उत्तम चित्रपट दिले. असं म्हणतात की, सुचित्रा इतक्या स्वाभिमानी होत्या की, किरकोळ कारणांवरून त्या मोठ्या चित्रपटांना नाकारायच्या. सुचित्राने त्यांच्या टॅलेंटने खूप नाव कमावले. पण एक चित्रपट फ्लॉप होताच, त्यांनी अचानक इंडस्ट्री सोडली. त्यांनी ३६ वर्षे स्वतःला खोलीत कोंडून ठेवले आणि मरेपर्यंत जगापासून लपून आयुष्य जगल्या.

साल १९४७मध्ये स्वातंत्र्यलढ्यात सुचित्रा यांचे कुटुंब बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये आले होते. इथे येताच वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी सुचित्राचा विवाह उद्योगपती दिबानाथशी झाला. पुढच्याच वर्षी सुचित्राने मुनमुन सेन या मुलीला जन्म दिला. १९५५ मध्ये आलेल्या ‘देवदास’ चित्रपटातून सुचित्रा हिंदी चित्रपटात आल्या. ७०च्या दशकात जिथे प्रत्येक अभिनेत्रीला राज कपूरसोबत (Raj Kapoor) काम करायचे होते, त्यावेळी सुचित्राने त्यांचा चित्रपट नाकारला होता. सलग हिट्स देऊन, सुचित्रा यश आणि प्रसिद्धीचा आनंद घेत होत्या. परंतु याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला. तेढ वाढल्यावर पती दिबानाथ तिला सोडून अमेरिकेला गेले. तर १९७० मध्ये दिबानाथ यांचे निधन झाले. (bollywood actress suchitra sen tragic life interesting facts)

सुचित्रा चित्रपटांमध्ये काम करत राहिल्या. पण १९७८ मध्ये आलेला ‘प्रोणोय पाश’ हा चित्रपट फ्लॉप होताच, त्यांनी अचानक चित्रपटजग सोडले आणि विस्मृतीत जगू लागल्या. सुचित्रा एका छोट्याशा खोलीत कोंडून राहू लागल्या. त्यांचे कुटुंबीयही त्याला भेटू शकत नव्हते. सुचित्राने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वत:ला एवढं लपवलं होतं की, २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावरही त्या के स्वीकारायला पोहोचल्या नाहीत.

२४ जानेवारी २०१३ रोजी, सुचित्रा यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे लोकांपासून लपून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे एक महिन्यानंतर १७ जानेवारी २०१४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या दिवशी सुचित्राला पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते, पण इथेही त्यांचा चेहरा दाखवला गेला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा