Wednesday, July 3, 2024

अलाना पांडेच्या संगीत साेहळ्यात लाेकांच्या नजरा सुहानाने नव्हे, तर ‘या’ मुलीने वेधल्या

चंकी पांडेची भाची अलाना पांडे हिचे लग्न होत आहे. लग्नाआधी, अलानाच्या प्री-वेडिंग प्राेग्रामध्ये सेलिब्रिटीसह इंडस्ट्रीतील स्टार किड्सनीही खूप आनंद लुटला. अलाना आज म्हणजेच 16 मार्चला लग्न करणार आहे. मात्र, याआधी तिच्या हळदी, मेहेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अलविरा खान, किम शर्मा, महीप कपूर, शिबानी दांडेकर, पलक तिवारी, दिया मिर्झा, अनुषा दांडेकर आणि सुहाना खान यांसारख्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश होता. अशात आता सुहाना खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोकांच्या नजरा समोरून वेगाने जाणाऱ्या मुलीने वेधले आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होते हे कोणालाच कळत नाही. असाच एक व्हिडिओ सुहाना खानचा समोर आला आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया युजर्सची नजर दुसऱ्या मुलीने वेधली आहे. सुहाना अलानाच्या संगीत सेरेमनीला पोहोचली होती. यावेळी तिने साडी नेसली हाेती, ज्याचा व्हिडिओ पॅपराझींने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी सुहाना येण्यापूर्वी वेगाने पळताना दिसत आहे, ज्यामुळे साेशल मीडिया युजर्स ती मुलगी नेमकी काेण? अशा भन्नाट कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहून एक युजरने कमेंट करत लिहिले की,”मला जाणून घ्यायचे आहे की, पहिली मुलगी का पळून गेली?”, तर दुसरा युजर कमेंट करत म्हणाल, “पहिली मुलगी जेवण संपेल म्हणून पळून गेली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अलानाने 2021च्या शेवटी एक पोस्ट केली होती, ज्यात इवारने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. फाेटाेमध्ये, इवर गुडघे टेकून अलानाला लग्नासाठी प्रपोज करताना दिसला, ज्यामध्ये वाळूवर लिहिले होते की, “माझ्याशी लग्न करशिल?” अलानाने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, ‘ती दोनदा लग्न करणार आहे, एकदा भारतात आणि दुसरी वेळ अमेरिकेत.'(bollywood actress suhana khan spotted at alaana panday sangeet ceremony netizens asking about other girl watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“अहंकार त्यांना करू देत नाही…” मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

फॅशन डिझायनरने दिली अमृता फडणवीस यांना धमकी, नेमके काय आहे प्रकरण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा