बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनी हिच्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट झाला आहे. हा स्फोट खूप शक्तिशाली होता. या स्फोटाची माहिती शोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी)ला इंफाळमध्ये एका फॅशन शो कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला. मात्र, मणिपूरच्या राजधानीतील हट्टा कांगजीबुंग भागात घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत.’ या शाेमध्ये अभिनेत्री सनी लिओन सहभागी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घटनास्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. असे सांगितले जात आहे की, ‘फॅशन शोच्या ठिकाणी स्फोटक यंत्राचा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. इम्फाळ पूर्व एसपी महारबम प्रदीप सिंह यांनी एएनआयला सांगितले की, ‘कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आम्हाला संशय आहे की, हे चीनी ग्रेनेडसारखे स्फोटक उपकरण आहे.’
सनी लिओन हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘वन नाईट स्टॅंड’, ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’, ‘रागिनी एमएमएस 2′,’कुछ कुछ लाेचा है’ यासारखे दमदार चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले.(bollywood actress sunny leone fashion show venue in imphal manipur no one injured in the accident )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शालिन भनोटची एक्स पत्नी दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात, ‘या’ व्यक्तीसोबत थाटणार संसार
जेव्हा रफी साहेबांच्या गळ्यातून गाणं गाताना आला होते रक्त, सतत १५ दिवस केला होता रियाज