बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतात. आपल्या चित्रपटाचा सीन याेग्य येण्यासाठी सेलेब्स शूटींगदरम्यान स्वत:चा जीव तळहातावर ठेवून शूट करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कोणत्याही धोकादायक स्टंट करण्यापुर्वी सीनच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी विविध व्यवस्था केल्या जातात, परंतु त्यानंतरही काही वेळा सेलिब्रिटी अपघाताला बळी पडतात. असेच काहीसे अभिनेत्री सनी लिओनीसोबत घडले.
सध्या सनी (sunny leone) तिचा आगामी चित्रपट ‘कोटेशन गँग’चे शूटिंग करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. अशातच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या पायाला जखम झाली आहे.
View this post on Instagram
तिच्या पायाच्या बोटातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. तरीदेखील सनी लिओनीला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. अशा परिस्थितीत तिची टीम स्प्रे करून तिचा उपचार करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनी चित्रपटाच्या गेटअपमध्ये दिसत आहे, ज्यात तिला ओळखणे थोडे कठीण आहे.
नुकताच ‘कोटेशन गँग’चा ट्रेलर रिलीज झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात सनी लिओनी व्यतिरिक्त जॅकी श्रॉफही दिसणार आहे. ‘कोटेशन गँग’ एक मस्त क्राईम थ्रिलर आहे. चित्रपटाची कथा गॅंगवॉरभोवती फिरणारी आहे. जी मुंबई, चेन्नई आणि काश्मीरमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या गॅंग्सची ही कथा आहे.
View this post on Instagram
‘कोटेशन गँग’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सनी लिओनी डेंजर दिसत आहे. हा चित्रपट एक तमिळ चित्रपट आहे, जो त्याच्या मूळ भाषेत तसेच हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होईल. विष्णू कन्नन हे ‘कोटेशन गँग’चे दिग्दर्शक तसेच निर्माते आहेत.(bollywood actress sunny leone injured during film quotation gang shooting)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी
क्रिती सेननचा कातिला अंदाज, फोटो गॅलरी तुमच्यासाठी