Saturday, March 15, 2025
Home नक्की वाचा आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच

आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच

हिंदी चित्रपटातील अभिनेत्री सुष्मिता सेन हिला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती. आता ती मुंबईतील ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘रॅम्प वॉक’ करताना दिसली. सुष्मिता सेन खूपच सुंदर दिसत होती. तिने सोनेरी रंगाचा भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

लॅक्मे फॅशन वीकने सुष्मिता सेनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सुंदर आउटफिट घालून रॅम्प वॉक करताना दिसली. तिने हातात एक सुंदर पुष्पगुच्छ घेतला आहे. कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर ती कोणाला तरी बोलवत पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. यानंतर तीने पुन्हा एकदा पोज दिली. सुष्मिता सेनच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. तिने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला.

विशेष म्हणजे मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी सुष्मिता सेन एक मॉडेल होती. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. लॅक्मे फॅशन वीकने व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘सुष्मिता सेन अनुश्री रेड्डीसाठी शोस्टॉपर बनली.’ याशिवाय तिने अनेकांना टॅगही केले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेननेही मेकअप केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला 10 मिनिटांत सुमारे 700 लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, मला तिची शैली खूप आवडते. ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेनचे अफेअर ललित मोदीसोबत होते. मात्र, नंतर त्यांनी ते नाकारले. (bollywood actress Sushmita sen ramp walk in lakme fashion week after heart attack viral video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बसलेल्या पोपटाने वेधलं लक्ष, त्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण

हे देखील वाचा