Tuesday, July 9, 2024

स्वरा-फहादच्या लग्नाची तयारी सुरू, सलवार सूटमध्ये पतीसोबत नाचताना दिसली अभिनेत्री

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कायदेशीर लग्न केले. अशात आता ती पुन्हा एकदा सर्व जगासमोर फहादसाेबत लग्न करण्यास तयार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. यासाेबत स्वरा सोशल मीडिया हँडलवरून तिच्या चाहत्यांना लग्नाचे संपूर्ण अपडेट्स देत आहे.

कोर्ट मॅरेजनंतर अभिनेत्री स्वरा (swara bhaskar) पुन्हा एकदा पती फहाद अहमदसोबत लग्न करणार आहे. स्वराच्‍या लग्‍नाबाबत तिच्या चाहत्‍यांना खूप उत्‍सुकता आहे. यापूर्वी स्वराच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचीही चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होती. ही लग्नपत्रिका फारच अनोखी होती. अनाेखी असण्याचे कारण म्हणजे निमंत्रण पत्रिकेत ना लग्नाच्या तारखेचा उल्लेख आहे, ना कुठेल विधी. मात्र, आता अभिनेत्रीच्या लग्नाचे सर्व विधी सुरु झाले आहेत, ज्यामध्ये स्वरा खूप आनंदी दिसत आहे.

नुकताच स्वराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. स्वराच्या ‘शीर कोरमा’ चित्रपटाचे दिग्दर्शक फराज आरिफ अन्सारी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो स्वराच्या घरी शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्वराच्या घरात ड्रम वाजताना दिसत आहे.

स्वराचा व्हिडिओ शेअर करत फराज आरिफने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘स्वरा आणि फहादच्या लग्नाचा उत्सव सुरू झाला आहे.’ व्हिडिओमध्ये फहाद त्याच्या साथीदारांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. स्वराच्‍या घरात दोन ढोलकी वादक आहेत, जे सतत ढोल वाजवून लग्‍नाच्‍या खास प्रसंगी आनंदी वातावरण निर्मिती करत आहेत.

स्वरा आणि फहादच्या लग्नाची सुरुवात मेहंदी सेरेमनीने होणार आहे. यानंतर संगीत समारंभ होईल, ज्यामध्ये कर्नाटक संगीत आणि कव्वाली सादर केली जाईल. लग्नानंतर स्वरा आणि फहाद दिल्लीत त्यांच्या खास पाहुण्यांना लग्नाचे रिसेप्शन देणार आहेत. स्वराच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर स्वरा ‘जहां चार यार’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात लवकरच दिसणार आहे.(bollywood actress swara bhaskar and fahad ahmad marriage rituals started actress dance on dhol beats video goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे त्याला बघण्यासाठी लोकांनी केली तोबा गर्दी, गेट फोडून आत घुसण्याचा झाला प्रयत्न

कपिल शर्मा शोमध्ये पंतप्रधान मोदी येणार पाहुणे? कॉमेडियनने विचारले असता पंतप्रधानांनी दिले ‘हे’ उत्तर

हे देखील वाचा