बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर स्वरा-फहादने पुन्हा दिल्लीत पूर्ण विधीसह कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थित लग्नगाठ बांधली.
अलिकडेच, स्वराच्या पाठवणीचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिनेत्री भावूक होताना दिसली. दरम्यान, अभिनेत्रीच्या रिसेप्शनचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये स्वरा पाकिस्तानी लूकमध्ये दिसत आहे. स्वराने तिच्या रिसेप्शनमध्ये पाकिस्तानातून आणलेला लेहेंगा परिधान केला हाेता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत हाेती.
Many congratulations, Fahad bhai and Swara Ji
Wishing you a blessed and happy life ahead. pic.twitter.com/apHXfXts0f
— Suhaib Ansari (Mannu) (@Suhaibansarii) March 19, 2023
दिल्लीत रिसेप्शन दिल्यानंतर स्वरा भास्करने बरेलीमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन दिले आहे. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. स्वरा-फहादने बरेलीतील ‘द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट’मध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान, स्वराच्या लूकची बरीच चर्चा झाली. स्वराने पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम कलरचा लेहेंगा परिधान केला होता. यासाेबतच अभिनेत्रीने लूक पुर्ण करण्यासाठी कानात मोठे झुमके आणि गळ्यात सुंदर चोकर नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत हाेती, तर तिचा नवरा फहाद याने पांढरी रंगाची शेरवानी आणि सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता, ज्यात ताे प्रचंड देखना दिसत हाेता.
स्वराने तिच्या रिसेप्शनचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लिहिले की, ‘हा लेहेंगा खूप सुंदर बनवला आहे. सीमेपलीकडून माझ्यासाठी पाठवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.’
स्वरा भास्करच्या रिसेप्शन पार्टीमध्ये समाजवादी पक्षाचे अनेक नेते पोहोचले हाेते. अशात सपा नेते शोएब अन्सारी यांनी स्वरा फहादच्या रिसेप्शन पार्टिचे फाेटाे साेशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (bollywood actress swara bhasker wedding reception first photos videos fahad ahmad )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी’ म्हणत अभिनेत्री शिवाली परबने केली ‘फुलराणी’साठी खास पोस्ट
‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा