Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री तब्बूचा सेटवर झाला अपघात; अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला झाली गंभीर दुखापत

अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) शूटिंग दरम्यान अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या आगामी ‘भोला’ चित्रपटात व्यस्त आहे. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. ज्याची शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे. दरम्यान, सेटवरून तब्बूसोबत अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

अजय देवगणच्या “भोला” या अ‍ॅक्शन चित्रपटात तब्बू (Tabu)एक निर्भीड आणि उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात स्टंट करताना अभिनेत्री थोडक्यात बाचवली आहे. या चित्रपट तब्बू अजय देवगणसोबत अनेक स्टंट करताना दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार
माध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात एका अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करताना घडला. जेव्हा ट्रक आणि मोटारसायकलची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की तब्बूच्या उजव्या डोळ्याच्यावर काच लागली. त्याचवेळी, सेटवर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुखापत फार खोल नव्हती, त्यामुळे टाके घालण्याची गरज नव्हती.

अजय देवगणने दिला विश्रांती घेण्याचा सल्ला
सेटवरील या अपघातानंतर अजय देवगणने तब्बूला आराम करण्यास सांगितले आहे. तिला पूर्णपणे बरी होईपर्यंत शूटिंगमधून ब्रेक घ्या असे सांगितले आहे. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त भोलामध्ये दीपक डोबरियाल शरद केळकर आणि संजय मिश्रा हे कलाकारही दिसणार आहेत. अजय देवगण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

तब्बूबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या पिढीतील सर्वात प्रतिभावान भारतीय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, तब्बू तिच्या चित्रपटातील भूमिकांबद्दल निवडक म्हणून ओळखली जाते. कलेतील तिच्या योगदानाबद्दल तिला भारत सरकारने २०११ मध्ये पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. अलीकडेच कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. भोला सोबतच दृश्यम २, कट्टे, आणि खुफिया या चित्रपटाचे शूटिंग चलू नाही झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील कलाकारांची सासवडच्या कानिफनाथ मंदिराला भेट!

गझलकार राहत इंदौरी पुण्यतिथी, वाचा राहत कुरेशी वरुन राहत इंदौरी होण्याचा रंजक किस्सा

‘तु ज्ञान पाजळू नकोस…’ स्वरा भास्करवर संतापले नेटकरी, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा