Monday, July 8, 2024

‘एवढी हिम्मत झालीच कशी?’ तापसी पन्नूनंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची रामदेव बाबांवर आगपाखड

मागच्या वर्षीपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. त्याचे संक्रमण दररोज वेगाने वाढत होते. अशात कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्न चालू होते. यातच रामदेव बाबा यांनी त्यांच्या औषधांच्या बळावर सर्वांचे आरोग्य ठीक होईल असा दावा केला होता. त्यांच्या औषधांना सर्वोच्च स्थान देणे इतपत योग्य होते, पण पुढे त्यांनी एलोपॅथी ट्रीटमेंटला मूर्ख विज्ञान म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

कोरोना विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांमध्ये मात्र निराशाजनक वातावरण झाले होते. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ट्वीट करून रामदेव बाबा यांना चांगलाच टोला लावला आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ट्विट करून लिहिले की, “या व्यावसायिकाला कोणत्यातरी कोव्हिड सेंटरला घेऊन जाण्याची गरज आहे. तिथे आपले डॉक्टर्स फ्रंटलाईन कामगिरी सोबत 24 तास उभे राहून काम करण्यास सांगितले पाहिजे. हे खूप अमानवीय, भयानक आणि लाजिरवाणा वक्तव्य आहे. हे कोणाचे टुलकिट आहे? त्यांची एवढी हिम्मत झालीच कशी?”

उर्मिला मातोंडकरने केलेल्या या ट्विटवर खूप प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “उर्मिला जी तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहे, हा भोंदू बाबा आहे.”

रामदेव बाबा यांनी केलेल्या या वक्तव्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे मत मागे घेण्यास सांगितले होते. मागील काही दिवसात अभिनेत्री तापसी पन्नूने देखील त्यांच्यावर चांगलाच राग व्यक्त केला होता. त्यावेळी ती हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की, “सध्या आपला देश कोरोना विषाणूशी लढत आहे. यावेळी डॉक्टर्स आणि मेडिकल स्टेज हेच हे योद्धे आहेत. आपण त्यांच्यासमोर ही लढाई नाही जिंकू शकत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा