बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती थाई हाय स्लिट वन पीस गाऊन घालून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. मात्र, अभिनेत्रीचीही स्टाईल साेशल मीडिया युजर्सना आवडली नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्राेल करण्यास सुरुवात केली. नेमके काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊया…
तर झाले असे की, उर्वशी राैतेला (urvashi rautela) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेट शेअर केले. शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री खूपच हाॅट दिसत असून तिचे फाेटाे इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहेत. उर्वशी रौतेलाने फोटोसोबत लिहिले आहे की, ‘तुमचा चेहरा नेहमी चमकत राहा आणि तुमची सावली तुमच्या मागे येऊ द्या.’
View this post on Instagram
मात्र, उर्वशी राैतेलाचे हे फाेटाेशूट साेशल मीडिया युजर्सला आवडलं नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्राेल करायला सुरुवात केली. एका ट्रोलने लिहिले आहे की, ‘ऋषभ पंतची 16 हाडे तुटली आहेत आणि तुम्ही इथे पोज देत आहात.’, तर एकाने लिहिले आहे, ‘आशिक बनाया आपने.’ अशात एका युजरने लिहिले आहे की, ‘बॉलिवुड इंडस्ट्रीतील अतिशय हॉट अभिनेत्री.’
View this post on Instagram
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काही दिवसांपुर्वी चांगलेच वाद झाले हाेते. यानंतर उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतला ट्रोल देखील केले हाेते. मात्र, तिने केलेल्या स्टाकिंगमुळे ती चर्चेचा विषय बनली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशात आता उर्वशी रौतेला तिचे लेटेस्ट हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत आहे. तिने अलीकडे अनेक फॅशन शोमध्येही भाग घेतला आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत हाेती.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 63 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या शोमध्ये दिसणार आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.(bollywood actress urvashi rautela brutally trolled latest hot photos troller wrote rishabh pant 16 bones are broken and you are posing on instagram)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा सुचित्रा सेन ‘त्या’ एका गोष्टीसाठी थेट गुलजार थांबलेल्या हॉटेलमध्ये त्यांना घेण्यासाठी पोहचल्या
हनुमान जयंतीनिमित्ताने ‘आदिपुरुष’सिनेमातील हनुमानाचा लूक रिव्हिल, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका