Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

रिषभ पंतच्या चाहतीमुळे उर्वशी रौतेलाचा संताप, ‘ते’ पोस्टर व्हायरल होताच म्हणाली…

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव अनेकदा क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडले गेले आहे. उर्वशीची पोस्ट पाहून ती ऋषभबद्दलच्या भावना व्यक्त करत असल्याचंही चाहत्यांनी म्हटलं आहे. तरीही क्रिकेटपटू कोणत्याही प्रकारची कमेंट करणे टाळताे. असे असले तरी, उर्वशी काेणत्या ना काेणत्या चर्चेत येते. अशातच आता उर्वशी एका व्हायरल फोटोवर कमेंट करून चर्चेत आली आहे.

तर झाले असे की, दीर्घकाळापासून शस्त्रक्रियेतून बरा झालेला ऋषभ नुकताच अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला. आणि गुजरात टायटन्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023च्या त्यांच्या पहिल्या होम मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला चिअर केले. या सामन्यादरम्यान एक मुलगी प्लेकार्ड घेऊन उभी दिसली, ज्यावर ‘थँक गॉड उर्वशी इथे नाही’ असे लिहिले होते. हा व्हायरल फोटो पाहून उर्वशी (urvashi rautela) हिला राग आल्याचे दिसत असून तिने यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने लिहिले की, “का?” अभिनेत्रीचे या पोस्टवर चाहतेही मजेशीर कमेंट करून रिप्लाय देत आहेत. एकाने लिहिले, “ऋषभ भैय्या को नजर लग जाती है.” तर दुसर्‍याने लिहिले, “तिने रौतेलाचा उल्लेख केला नाही, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

काही दिवासांपुर्वी अभिनेत्री उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील डेटिंगच्या अफवा तुफान पसरल्या होत्या. इतकंच नाही तर, यापूर्वी उर्वशीने एका मुलाखतीत दावा केला होता की, ‘मिस्टर आरपी’ने तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बराच वेळ वाट पाहिली होती. ती आरपीच्या नावाने अनेक वेळा सिक्रेट पोस्ट देखील लिहिते, ज्यावर चाहत्यांचा असा अंदाज आहे की, ती फक्त ऋषभसाठी पोस्ट असते. उर्वशी अनेकवेळा ऋषभ पंतची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्येही दिसली आहे. ऋषभचा  अपघात झाला तेव्हा अभिनेत्री आणि तिच्या आईनेही क्रिकेटरच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली हाेती. (bollywood actress urvashi rautela was trolled during the ipl match 2023 in the stadium she reacted)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
रितेश देशमुखने भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केला ‘तो’ फोटो शेअर, वडिलांची आठवण काढत म्हणाला…

सुचित्रा सेन | एक चित्रपट फ्लॉप होताच सोडली इंडस्ट्री, तब्बल ३६ वर्षे स्वतःला खोलीत ठेवले कोंडून

हे देखील वाचा