विद्या बालन ही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने भिन्नभिन्न भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. 2009 मध्ये आलेल्या ‘पा‘मध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारून सर्वांनाच थक्क केले हाेते. मात्र, ही भूमिका साकारण्याची अभिनेत्रीची इच्छा नव्हती. मग कशाप्रकारे ही भूमिका साकारण्यास अभिनेत्रीने सहमती दर्शवली? याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने केला आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विद्या बालन (vidya balan) हिने सांगितले की, सुरुवातीला ती चित्रपट करण्यास राजी नव्हती, पण नंतर तिने स्क्रिप्ट तिच्या जवळच्या लोकांना पाठवली आणि मग निर्णय घेतला. ‘पा’ हा चित्रपट आर बाल्की यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला होता, ज्यामध्ये अभिषेक बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. अभिनेत्रीने सांगितले की, ‘तिने स्क्रिप्ट तिच्या मित्रांना पाठवली आणि नंतर त्यांच्या मताची वाट पाहिली.’
अभिनेत्री म्हणाली, “मला त्या चित्रपटाला हो म्हणायला खूप वेळ लागला. कारण, जेव्हा बाल्कीने माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला वाटलं, ‘ही कोणत्या प्रकारची कथा आहे? ते वेडे आहेत. आणि अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका करायला तो माझ्याकडे का आला? हीच एक स्क्रिप्ट होती जी मी माझ्या काही मित्रांसोबत शेअर केली होती. सुरुवातीला मला धक्काच बसला होता, पण नंतर लक्षात आले की, ही एक उत्तम स्क्रिप्ट आहे.”
विद्या पुढे म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून मला ते करायचं होतं, पण काही लोकांनी ते वाचावं आणि त्यांना त्याबद्दल काय वाटतं ते मला सांगावं अशी माझी इच्छा होती. आणि ते फक्त म्हणाले की, ‘तू हे कर.’ मात्र, मला हो म्हणायला वेळ लागला.”
‘पा’चित्रपटामध्ये, अमिताभ बच्चन यांना वयाच्या 12 व्या वर्षी प्रोजेरिया नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त दाखवले आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि विद्या त्याच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका वेगळ्या विषयावर बनवण्यात आला होता. माात्र, तरीदेखील ताे ब्लॉकबस्टर ठरला नाही. या चित्रपटाने एकूण 30 कोटींचा व्यवसाय केला.(bollywood actress vidya balan did not approve of playing amitabh bachchan mother in paa movies told in an interview)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ आघाडीच्या अभिनेत्रीला साऊथ इंडस्ट्रीमध्ये केले बॅन?
अभिनेते शाहबाज खान यांनी आईच्या सांगण्यावरून सोडले संगीत, काय आहे यामागची गोष्ट? एकदा जाणून घ्याच