Tuesday, March 10, 2026
Home बॉलीवूड विद्या बालनचा ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनवार; कमेंट करत म्हणाले…

विद्या बालनचा ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनवार; कमेंट करत म्हणाले…

चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची अनाेखी छाप सोडणारी विद्या बालन अनेकदा साडीत दिसते. तिचे सोशल मीडिया अकाउंट बघितले, तर ती फक्त साडीतच फोटो शेअर करते. मात्र, आता विद्याने साडी सोडून असे फोटोशूट केले आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. विद्याचा टॉपलेस फोटो चाहत्यांचे होश उडवत आहे.

विद्या बालन (vidya balan) हिने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर फोटोशूटसाठी बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे. अशात काही लोक अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत, तर काही सोशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या फाेटाेवर भिन्नभिन्न कमेंट करुन तिला ट्राेल करत आहे.

खरे तर, प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने विद्या बालनचे फोटोशूट त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये विद्या वर्तमानपत्र हातात धरून कपडे न घालता पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या एका हातात वर्तमानपत्र आहे, तर दुसऱ्या हातात कप आहे. याशिवाय अभिनेत्रीने गाॅगलही लावलेला यामध्ये दिसत आहे. विद्याचे हे न्यूड फाेटाेशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

विद्या बालनचा हा फोटो पाहून काही लोक कमेंट सेक्शनमध्ये तिची स्तुती करत आहेत, तर काहीजण ‘अभिनेत्री तिचे कपडे घालायला विसरली आहे’ असे विनोदी कमेंट करत आहेत.’ असे स्टार्स कोणाचे आदर्श असू शकत नाहीत, ‘द डर्टी’ चित्रपटाची आठवण आली, हे तुला शोभतं का?’ द डर्टी हा चित्रपट साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सिल्कची भूमिका साकारून विद्या खूप चर्चेत आली हाेती.

डब्बू रत्नानीने शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर यांचे फोटोशूट केले आहे. परंतु विद्याच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.(bollywood actress vidya balan topless photoshoot for dabboo ratnani fans shocked viral on internet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’

अखेर दिड महिन्यानंतर टीव्ही अभिनेता शिजान खानला कोर्टाने दिला जामीन, बहिणी शेअर केला फोटो

हे देखील वाचा