विद्या सिन्हा या बॉलिवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘रजनी गंधा’, ‘छोटी सी बात’, ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्रीने मिस बॉम्बेचा पुरस्कार जिंकला आहे. बुधवारी( १५ नोव्हेंबर) त्यांची जयंती आहे त्या चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.
विद्या यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७. रोजी मुंबई येथे झाला होता. विद्या यांनी १७ वर्षांच्या असताना अभिनय क्षेत्रात त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांचा पहिला चित्रपट ‘राजा काका’ हा होता. त्यांना ‘रजनी गंधा’ या चित्रपटातून ब्रेक मिळाला. त्यांनतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. (Bollywood actress Vidya sinha birthday know about her personal life)
विद्या यांनी त्याच्या शेजारी राहणाऱ्या तमिळ ब्राह्मणाच्या मुलासोबत लग्न करून सगळ्यांना हैराण केले होते. लग्नानंतर अनेक वर्ष झाले तरी देखील त्यांना मुल झाले नाही म्हणून त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. जिचे नाव त्यांनी जान्हवी असे ठेवले. काही दिवसांनी त्यांच्या पतीचे आजाराने निधन झाले.
विद्या यांनी २००१ साली ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर नेताजी भीमराव साळुंखे यांच्यासोबत दुसऱ्याचा विवाह केला. लग्नाच्या आठ वर्षानंतर त्यांनी त्यांच्या पतीवर शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप लावला २०१९ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला.
विद्याने सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत आगमन केले. त्यानंतर त्यांनी ‘बहु राणी’, हम दो है ना’, ‘भाभी’, ‘काव्यांजली’, ‘चंद्रनंदिनी’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगातून निघून गेल्या.
त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘ममता’, ‘जिवन मुक्त’, कर्म’, ‘मुक्ती’, ‘किताब’, ‘इंकार’, ‘चालू मेरा नाम’, ‘तुम्हारे लिये’, ‘प्यारा दुश्मन’, ‘जोश’, ‘बिजली’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–ना अभिनेता, ना क्रिकेटर…मृणाल ‘या’ घटस्फोटित रॅपर आणि गायकाला करते डेट? व्हिडिओ व्हायरल
–करीना कपूर खान तिचा कोणताही चित्रपट का पाहत नाही? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले कारण