Wednesday, June 26, 2024

Hijab Controversy | जेव्हा भुमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रींनी घातला हिजाब- बुरखा, प्रेक्षकांनीही दर्शवली पसंती

कर्नाटकमधील शाळेत झालेल्या हिजाब प्रकरणाने (Hijab Controversy) सध्या देशभरात प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक हायकोर्टाने शाळा आणि कॉलेज बंद केले आहेत. मात्र देशभरात अनेक ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटत आहेत. चित्रपट जगतातही या प्रकरणावर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. हिजाब घालावे की घालू नये, इथपासून अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. हिंदी चित्रपटातील अनेक अभिनेत्रींनी या आधीही आपल्या भूमिकेत हिजाब घालून चित्रपटात काम केले आहे. कोण आहेत या अभिनेत्री चला जाणून घेऊ.

दिया मिर्झा (Dia Mirza)
अभिनेत्री दिया मिर्झाने झी 5 वरील ‘काफिर’ चित्रपटात एका पाकिस्तानी महिलेची भूमिका निभावली होती. यामध्ये तिनेहिजाब घातल्याचे आढळून आले आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt)
अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. आपली प्रत्येक भूमिका ती मनापासून साकारत असते. तिच्या ‘राजी’ आणि’ गली बॉय’ चित्रपटांमधील भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. यावेळी तिने हिजाब घातल्याचे पाहायले मिळाले.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दीपिकाने ओळख मिळवली आहे. दीपिकाने ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये एका सीनमध्ये तिने बुरखा घातलेला होता.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपट क्षेत्रातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट सुपरहिट केले आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्राचा ‘७ खून माफ’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात तिने बुरखा घातला होता. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
अभिनेत्री कॅटरिना कैफसुद्धा आपल्या अभिनयाने चित्रपटात जीव ओतून काम करते. तिने ‘ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात बुरखा घातला होता. चित्रपटात कॅटरिना आणि इम्रान खान यांनी भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा