Monday, February 26, 2024

अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या या अभिनेत्रींचंं 12 वी पर्यंतही नाही झालं शिक्षण, कंगणाचंही नाव यादीत

असं म्हणतात,कोणत्याही व्यक्तीला माणुस बनायला शिक्षणाची गरज असते. शिक्षण असं शस्त्र आहे ज्याने मोठमोठी युद्ध जिंकता येतात. आजच्या घडीला आई-वडील भलेही अशिक्षित असतील पण मुलांना चांगलं शिक्षण द्यायला ते नेहमीच तत्पर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? ग्लॅमर वर्ल्ड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्यांचं 12 पर्यंतचं शिक्षण देखील पुर्ण केलेलं नाही. परंतु त्यांनी आयुष्यात मोठं यश प्राप्त केलं आहे. चला तर मग त्या अभिनेत्रींवर एक नजर टाकुयात.

 • कतरीना कैफ(katrina kaif)
  नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटामुळे कतरीना सध्याला खुप चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि चाहत्यांकडुन चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या, परंतु तरीही हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर तो अयशस्वी ठरला. कतरीनाबद्दल सांगायचं तर तिने तिचं शिक्षण अर्ध्यात सोडलं होतं. ती कधीही शाळेत गेली नाही, तर तिने होम ट्युटरच्या माध्यमातुनच शिक्षण घेतलं.
 • कंगणा रानौत(Kangna Ranaut)
  बाॅलिवुडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी आणि इंडस्ट्रीची क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगणा रानौतचं नावदेखील या लिस्टमध्ये आहे. कंगणा 12ची परिक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. ती 12वी फेल झाली होती, त्यानंतर तिने घर सोडलं आणि दिल्लीला आली.दिल्लीत तिने माॅडेलिंगला सुरुवात केली आणि पुढे एक यशस्वी अभिनेत्रीही बनली.
 • करिश्मा कपूर (Karishma kapoor)
  90च्या दशकात आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री करिश्मा कपूरचा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे. 90च्या दशकात या अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिले. परंतु लहान वयातंच चित्रपटांमध्ये काम करायला लागल्यामुळे तिला शिक्षणाला वेळ देता आला नाही. त्यामुळे तिने सहावीतंच शिक्षण सोडले.
 • काजोल (Kajol)
  बाॅलिवुडच्या टाॅप अभिनेत्रींमधली एक काजोलदेखील तिचं शिक्षण पुर्ण करु शकली नव्हती. ती 16 वर्षांची असताना राहुल रवैल यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यामुळे तिचं शिक्षण सुटलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ कारणामुळे अनन्याच्या चित्रपटात येण्याच्या निर्णयाला चंकी पांडे यांनी घेतली नाही सिरिअस, अभिनेत्रीने केला खुलासा
कोणी वीट तर कोणी दिले पैसे, अशाप्रकारे बॉलिवूड कलाकारांनी अयोध्या मंदिराला लावला हातभार

हे देखील वाचा