Tuesday, July 9, 2024

विराटच्या लाईव्ह सेशनमध्ये अनुष्काची एन्ट्री; म्हणाली ‘माझे हेडफोन्स कुठे ठेवलेत?’ त्यानेही दिले भन्नाट प्रत्युत्तर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे जोडपं चांगलंच प्रसिद्ध आहे. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या घरी एका गोंडस चिमुकलीने एन्ट्री घेतली आहे. ते दोघेही आई- वडील झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांची मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच विराटने इंस्टाग्राम लाईव्ह सेशन ‘आस्क मी एनिथिंग’चे आयोजन केले होते. यादरम्यान त्याला चाहत्यांनी अक्षरश: प्रश्नांचा पाऊस पाडला. त्याचे उत्तरही विराटने दिले. खरी मजा तर तेव्हा आली, जेव्हा स्वत: पत्नी अनुष्काने त्याला लाईव्ह सेशनमध्ये मजेशीर प्रश्न विचारला.

अनुष्काने विराटला लाईव्ह सेशनमध्ये विचारले होते की, “तू माझे हेडफोन्स कुठे ठेवले आहेत?” यावर विराटने उत्तर देत म्हटले की, “नहेमीप्रमाणे बेडच्या शेजारील टेबलवर.” चाहत्यांना या जोडप्याचा हा अंदाज खूपच आवडला आहे.

चाहत्यांनीही विराटला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यानेही मोकळेपणाने प्रत्युत्तर दिले. जेव्हा एका चाहत्याने त्याला विनंती केली की, “तू आपला सध्याचा फोटो शेअर करू शकतो का, तू काय करत आहे त्याचा?” यावर विराटने लगेच आपला चहा पितानाचा एक फोटो पाठवला. जेव्हा विराटला एका चाहत्याने विराटच्या लहानपणीचा फोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तो त्याने चाहत्याची ही इच्छाही पूर्ण केली.

चाहत्यांनी विराटच्या मुलीला पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यावर अनुष्काने स्पष्ट केले होते की, ते आपल्या मुलीचा फोटो तोपर्यंत दाखवणार नाही, जोपर्यंत तिला सोशल मीडियाचे ज्ञान येत नाही. खरं तर अनुष्काने यावर्षी ११ जानेवारीला मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी ही आनंदाची बातमी विराटने सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांना दिली होती.

विराटने ट्वीट करत लिहिले होते की, “आम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला आयुष्यातील ही गोष्ट अनुभवायला मिळाली. आम्हाला माहित आहे की, तुम्ही आमच्या गोपनियतेचा सन्मान कराल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा