Saturday, June 29, 2024

कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असते. मग कधी तिने केले वक्तव्य असो किंवा तिचा चित्रपट, नाहीतर मग तिचे वैयक्तिक आयुष्य असो. कंगना रणौत आणि प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच दरम्यान कंगना आणि अध्ययन हे प्रेमात पडले आणि रिलेशनशिप आले. परंतु काही दिवसांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. याच संदर्भात बराच काळानंतर, अभिनेता अध्ययनने त्यांच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल वक्तव्य केले आहे.

अध्ययन सुमनने नुकतेच एका माध्यमाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत, अध्ययन सुमनने कंगना रणौतचे नाव न घेता, २०१६ मध्ये दिलेल्या मुलाखतीबद्दल बोलला. अध्ययनने सांगितले की, त्याला एक फ्लॉप अभिनेता आणि प्रसिद्धीचा भूकेला असे म्हटले गेले होते. त्यांच्या नात्यात कडवटपणा आहे का असे विचारले असता, त्याने सहज उत्तर दिले की, ‘हो’. (“I was very upset mentally because of this relationship,” said Adhyayan Suman)

 

त्याचबरोबर एका माध्यमाशी बोलताना अध्यायन म्हणाला की, “मला वाटते की त्या नात्यामुळे मी मानसिक दृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. मी तरुण असल्याने त्याचा प्रभाव माझ्यावर बराच काळ राहिला. मला या सगळ्यातून बाहेर पडण्यास बरीच वर्षे लागली. या सर्व गोष्टी विसरणे माझासाठी खूप कठीण होते. आता मला आश्चर्य वाटते की मी हे का केले?”

अध्ययन पुढे म्हणाला की, “शेवटी ही लढाई त्या व्यक्तीशी नव्हती, ती स्वतःशी होती आणि तुम्ही नेहमी स्वतःला सांगत राहिलात की मी थांबलो असतो किंवा हे केलं नसतं. मी का ऐकले नाही? मी नक्कीच मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण टप्प्यातून गेलो.”

अध्ययन सुमनने त्याचे वडील शेखर सुमन यांच्या शब्दांबद्दलही सांगितले, ज्यामुळे त्याला या अडचणीतून बाहेर पडण्यास खूप मदत झाली. तो म्हणाला की, “माझे वडील मला नेहमी सांगायचे की, कोणीही चांगले किंवा वाईट नाही. जेव्हा तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आलात, जर तेव्हा तुम्ही कदाचित एकमेकांपासून वेगळे झालात तर हा विचार करायचं, की तुम्ही एकमेकांसाठी बनलेले नसाल. हाच विचार करून मग मी आयुष्यात पुढे गेलो.”

गेल्या वर्षी, जेव्हा बॉलिवूडमध्ये ड्रग्ज रॅकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची चौकशी सुरू होती, तेव्हा कंगनाबद्दल अध्ययनने दिलेली एक जुनी मुलाखत समोर आली होती. २०१६ मध्ये दिलेल्या मुलाखतीत, अध्ययनने दावा केला होता की कंगना कोकीन आणि हशीश सारखे ड्रग्ज घेते.

कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांचा ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूज’ हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुघलांना ‘डाकू’ म्हटल्यामुळे ‘या’ कलाकारांच्या निशाण्यावर आले मनोज मुंतशीर; ऋचा म्हणतेय, ‘खूपच बकवास…’

-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज

-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा