कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यामध्ये नेहमीच सोशल मीडियावर सतत शीतयुद्ध चालू असते. दोघीही नेहमी एकमेकींवर कटाक्ष ठेऊन ट्वीट करत असतात. परंतु यावेळी तापसी कंगनासाठी असे काहीतरी बोलली, ज्यामुळे ‘पंगा गर्ल’ला उत्तर द्यावेच लागले. खरं तर, तापसी पन्नूला अलीकडेच ‘थप्पड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
नुकतेच कंगना रणौतने चाहत्याच्या एका ट्विटला प्रत्युत्तर दिले, ज्यात तापसी पन्नूची व्हिडिओ क्लिप शेअर केली गेली होती. व्हिडिओमध्ये दिसून येते की, तापसी पन्नूला ‘थप्पड’ चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला, तर पुरस्कार स्वीकारताना तापसीने कंगनाचे आभार मानले.
https://twitter.com/Bipin64805424/status/1380465902852960259
या ट्विटला प्रत्युत्तर देत कंगनाने लिहिले की, “धन्यवाद तापसी, या विमल वेलची फिल्मफेअर पुरस्कारासाठी तू पात्र आहेस, तुझ्याशिवाय इतर कोणीही यासाठी पात्र नाही.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1380468159606579201
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये कंगना रणौत (पंगा), दीपिका पदुकोण (छपाक), जान्हवी कपूर (गुंजन सक्सेना) आणि विद्या बालन (शकुंतला देवी) या अभिनेत्रींनाही नामांकन मिळाले होते. उल्लेखनीय आहे की, कंगना रणौतला नुकताच ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला आहे. कोरोनाची दुसरी लाट ज्या वेगाने वाढत आहे, हे पाहता बर्याच राज्यात पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या साथीचा परिणाम पुन्हा एकदा करमणूक उद्योगावर दिसून येत आहे. एकामागून एक चित्रपट पुढे ढकलले जात आहेत. त्याचप्रमाणे, आता कंगना रणौतच्या आगामी चित्रपट ‘थलायवी’ची रिलीझ डेटही पुढे ढकलली गेली आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी रिलीझ होणार होता. तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहिर झाली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ
-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज