Friday, July 5, 2024

मायलेकीच्या जाेडीला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी केले ट्राेल, म्हणाले, ‘दुसरी हेअरस्टाइल पाहायला…’

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्या मुलगी आराध्यासह कान्सला रवाना झाली आहे. खरे तर, अभिनेत्री मंगळवारी (दि. 16 मे)ला मुलगी आराध्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. जिथे तिने चाहत्यांसोबत सेल्फीही क्लिक केली. अशात सोशल मीडियावर मायलेकीच्या जोडीचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. काही लोक ऐश्वर्या आणि आराध्याच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर काही जण आराध्याच्या हेअरस्टाइलसाठी ट्रोलही करत आहेत.

एअरपोर्टवर ऐश्वर्या (aishwarya rai bachchan) ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने ब्लॅक जॅकेट घातले होते आणि आपले केस खुले साेडले हाेते. दुसरीकडे, आराध्याच्या लुकबद्दल बाेलायचे झाले, तर तिने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला होता, ज्यावर डेनिम जॅकेटही घेतले हाेते. महत्वाचे म्हणजे आराध्याच्या जॅकेटच्या मागील बाजूस A असे लिहिले होते आणि नेहमी प्रमाणे आराध्याने साधना हेअरस्टाई केली हाेती. मात्र, वारंवार मायलेकीची एकच एक हेअरस्टाईल पाहून युजर्सने अभिनेत्रीला ट्राेल करायला सुरुवात केली.

ऐश्वर्या आणि आराध्याच्या व्हिडिओवर युजर्स जाेरदार कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मला आता दुसरी हेअरस्टाइल पाहायला मिळावी अशी इच्छा आहे.’, तर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ऐशला काय झाले? तीचा ड्रेस अप, तीची हेअरस्टाईल. तिचे आयुष्य कंटाळवाणे झाले आहे असे दिसते. आता थोडा बदल हवा आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

मंडळी, कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे पासून सुरु झाला आहे. यामध्ये सारा अली खान, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर आणि उर्वशी रौतेला यांनी रेड कार्पेटवर आपल्या साैेदर्याचा जलवा दाखवला. या भारतीय सेलिब्रिटींच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(bollywood aishwarya rai bachchan trolled for her look as she heads to cannes 2023 with daughter aaradhya )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलासादायक! चित्रपटगृहांना वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणे सक्तीचे अन्यथा…,राज्य सरकारचा मोठा निर्णय

‘यह पर्दा हटा दो, ज़रा मुखड़ा दिखा दो…’, श्रेया बुगडेचा ‘ताे’ व्हिडिओ चर्चेत

हे देखील वाचा