क्विज रिअॅलिटी शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’च्या आगामी भागात बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिलन गुलशन ग्रोवर, शक्ती कपूर आणि चंकी पांडे गेस्ट म्हणून दिसणार आहेत. या भागात तिघांनीही प्रचंड धमाल केली असून आपल्या चित्रपटांतील काही आयकॉनिक डायलॉग पुन्हा एकदा साकारले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोवर आणि ‘क्राइम मास्टर गोगो’ शक्ती कपूर अक्षय कुमारकडून १ कोटी रुपयांची फिरौती मागताना दिसतात. मात्र, अक्षय कुमारसमोर त्यांचे हे डावपेच फसतात. एका बाजूला अक्षय आणि गुलशन ग्रोवर ‘हेरा फेरी’मधील प्रसिद्ध डायलॉग ‘कबीरा स्पीकिंग’ रीक्रिएट करून प्रेक्षकांना खळखळून हसवतात, तर दुसऱ्या बाजूला शक्ती कपूर आपल्या खास स्टाईलमध्ये धमकी देताना दिसतात.
व्हिडिओमध्ये गुलशन ग्रोवर अक्षयला म्हणतो, “कबीरा स्पीकिंग… भगवानाची शपथ, तुझा शो पाहून दिल गार्डन-गार्डन झालं. शो पुढे चालवायचा असेल तर १ कोटी बाहेर काढ.” याच क्षणी अक्षयला आणखी एक फोन येतो, जो शक्ती कपूरचा असतो. फोन उचलत अक्षय म्हणतो, “आत्ता लुटतोय, नंतर फोन कर.”
यावर शक्ती कपूर आपल्या स्टाईलमध्ये म्हणतात, “मी आहे क्राइम मास्टर गोगो. मला १ कोटी मिळाले नाहीत तर डोळे काढून गोट्या खेळेन.” यावर अक्षय (akshay)दोघांनाही उत्तर देताना म्हणतो, “खेळायची इतकीच हौस असेल तर मी तुम्हा दोघांना १ कोटी देतो… या माझ्या शोमध्ये!” व्हिडिओच्या शेवटी गुलशन आणि शक्ती दोघेही म्हणतात, “ये रहे हैं!”
https://www.instagram.com/reel/DUI8k9zAeDR/?igsh=ODJncGE3aHpjM3lv
या एपिसोडमध्ये मनोरंजनाचा डोस आणखी वाढतो, जेव्हा OG क्राइम मास्टर शक्ती कपूर आणि अभिनेता चंकी पांडे अक्षय कुमारसोबत शोमध्ये सहभागी होतात. आगामी भागात प्रेक्षकांना भरपूर विनोद आणि क्लासिक बॉलिवूड व्हाइब्स अनुभवायला मिळणार आहेत.
अक्षय कुमार या शोमध्ये एक खास किस्सा शेअर करताना सांगतो की, चंकी पांडे अॅक्टिंग स्कूलमध्ये त्यांचे सीनियर होते. अॅक्टिंग क्लासदरम्यान चंकी पांडे अमिताभ बच्चनचे सीन रीक्रिएट करून त्यांना अॅक्टिंग शिकवायचे. आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत अक्षय म्हणतो, “चंकी माझे पहिले अॅक्टिंग टीचर आहेत.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
45 वर्षांनंतर कल्पना अय्यरने ‘रंबा हो’ रीक्रिएट केले, 70 व्या वर्षी केला भन्नाट डान्स










