Tuesday, July 9, 2024

‘या’ दिग्गज दिग्दर्शकाला सलमानसोबत करायचा आहे अ‍ॅक्शन चित्रपट, चौथ्यांदा करणार एकत्र काम

बॉलिवूड दिग्दर्शक अली अब्बास जफर(Ali Abbas Zafar) यांच्या सुलतान, टायगर जिंदा है आणि भारत सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. याचित्रपटानंतर सलमान खान(Salman Khan) आणि अली जफरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्वत: दिग्दर्शकानेच सलमानच्या चाहत्यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक इशारा दिला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अली भाईजानसोबत एक ऍक्शन चित्रपट करणार आहे.

माध्यमांशी बोलताना अली अब्बास जफरने कबूल केले की, त्याने आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. वृत्तानुसार, दिग्दर्शक म्हणाला, ‘इंशाअल्लाह सलमान सर आणि मी एक बिग बजेट चित्रपट करण्यासाठी एकत्र येऊ. मला त्याच्यासोबत एक मोठी ऍक्शन सिनेमा करायचा आहे. मी या चित्रपटावर काम सुरू केले असून लवकरच मी त्याच्यासोबत स्क्रिप्ट शेअर करणार आहे.

चौथ्यांदा ही जोडी तयार होणार आहे
अली अब्बास जफरच्या वक्तव्यावर नजर टाकली, तर सलमान आणि अलीची जोडी मोठ्या पडद्यावर चौथ्यांदा दिसणार आहे. मात्र, सलमानची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याचबरोबर सलमानने या चित्रपटासाठी हो म्हटले आहे की नाही, याची अधिकृत माहिती आली नाही कारण सलमानने या चित्रपटाची स्क्रिप्ट पाहिली नाही.

‘टायगर 3’ ची आतुरतेने वाट पाहतोय
पुढे अली जफरने कबीर खान आणि मनीष शर्माचे कौतुक केले आणि ‘टायगर 3’ वर आपली प्रतिक्रिया दिली. अहवालानुसार, दिग्दर्शकाने सांगितले की, यशराज फिल्म्सच्या ऍक्शन-थ्रिलर टायगर फ्रँचायझीच्या तिस-या भागाचे त्याच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे तो दिग्दर्शन करू शकला नाही, परंतु तो चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. पुढे बोलताना कबीर खान आणि मनीष शर्मा यांचे कौतुक करताना ते म्हणाले की कबीर खान, मी आणि आता मनीष, आपण सर्वांनी आपापल्या चित्रपटांमध्ये आपली व्यक्तिरेखा आणली आहे. मी टायगर 3ची आतुरतेने वाट पाहत आहे. मला वाटते की ते खूप मनोरंजक असेल आणि मी आनंदी आहे.

कबीर खानने 2012 मध्ये पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ दिग्दर्शित केला होता, तर जफरने दुसरा भाग ‘टायगर जिंदा है’ दिग्दर्शित केला होता. थ्रीक्वल, आता 21 एप्रिल 2023 रोजी पडद्यावर येणार आहे, त्याचे दिग्दर्शन फॅन आणि बँड बाजा बारात फेम मनीष शर्मा यांनी केले आहे

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्लॅक ब्युटी! उर्मिला कोठारेचा बोल्ड लूक व्हायरल

अंजली अरोरानंतर आणखी एका भोजपुरी अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडिओ लीक? चाहते आणि ट्रोलर्समध्ये रंगला वाद
जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरणावर येणार चित्रपट ‘या’ दिवशी पोहायला मिळणार मोफत प्रिमियर

हे देखील वाचा