Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड दु: खद! अभिनेता अली फजलच्या आजोबांनी घेतला अखेरचा श्वास, काही महिन्यांपूूर्वी झाले होते आईचे निधन

दु: खद! अभिनेता अली फजलच्या आजोबांनी घेतला अखेरचा श्वास, काही महिन्यांपूूर्वी झाले होते आईचे निधन

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा अभिनेता अली फजलच्या आईचे मागील वर्षी जून महिन्यात निधन झाले होते. हे दु: ख विसरत असतानाच आता त्याच्यावर परत एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आजोबांचे निधन झाले आहे. आपल्या आजोबांच्या निधनाबद्दल त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले आहे.

त्याने सांगितले की, त्याच्यासाठी त्याचे आजोबा वडिलांसारखेच होते. आजोबांच्या मृत्यूनंतर तो पुन्हा एकदा खचला आहे.

आजोबांच्या निधनानंतर अली फजल खूपच भावुक झाला आहे. इंस्टाग्रामवर आजोबांचे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ‘मला त्यांनी छाया दिली. जेव्हा माझे आई- वडील एक वेगवेगळे जीवन जगत होते, तेव्हा त्यांनी मला सोबत ठेवले. म्हणून जेव्हा माझे वडील मध्य आशियात होते, तेव्हा नानांचेच प्रेम मला मिळाले होते. मोठी कहाणी थोडक्यात… ते रात्री मरण पावले. त्यांची मुलगी आणि माझी आई गेल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी दिवसातच असे झाले. मला वाटते की, ही त्यांची इच्छा होती. बरेच लोक या देशात संघर्ष करत आहेत, तसे आपणही करू शकतो. परंतु या कारणामुळे मी खूप भावुक झालो आहे.’

अलीने पुढे लिहिले, ‘त्यांची फार इच्छा होती की, त्यांच्या अंतिम संस्काराच्यावेळी मी त्यांना विनोद सांगू. कारण त्यांना दु: खी लोक आवडत नाहीत. म्हणून मी त्यांच्या थडग्यावर एक छोटी चिठ्ठी ठेवली, ज्यामध्ये ‘से चीज’ असे म्हटले आहे, जो एक न सांगितलेला विनोद होता. पण हो, मी दिलगीर आहे (गुस्ताखी माफ).’

अली फजल पुढे म्हणाला, ‘मी त्यांची काही छायाचित्रे पोस्ट करत आहे. हे माझ्या संग्रहासाठी आहेत. कारण आपल्यापैकी बर्‍याच जणांना दु: खाचा सामना कसा करावा हे माहीत नाही. चित्रपटांचा संदर्भ येथे चालत नाही.’

त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अली फजल अखेर ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये दिसला होता. याव्यतिरिक्त तो ‘बॉबी जासूस’, ‘फुकरे’ यासह अनेक चित्रपटात दिसला आहे.

त्याने ‘३ इडियट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इतकेच नव्हे तर अलीने हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. त्यात ‘फास्ट एँड फ्युरियस’ या चित्रपटाचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

-‘ऑल टाईम फेव्हरेट’, अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ऍनिमल प्रिंटेड ड्रेसमधील फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौतने तापसी पन्नूवर केलेल्या कमेंटवर भडकले चाहते, म्हणाले…

हे देखील वाचा