Monday, July 8, 2024

‘मी काय दान करण्याची वस्तू आहे का?’ आलिया भट्टने ‘कन्यादान’ प्रथेवर केले प्रश्न उपस्थित

बॉलिवूडची ‘क्यूट गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट होय. आलिया सध्या तिच्या आगामी प्रोजक्टच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आलिया सोशल मीडिया बरीच सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. कित्येक वेळा आलियाने शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकर्‍यांनी तिला ट्रोल देखील केले आहे. ट्रोलचा विचार न करता आलिया बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शविली आहे. व्हिडिओमध्ये आलियाने लग्न सोहळ्यात होणाऱ्या मुलींच्या ‘कन्यादाना’वर प्रश्न उपस्थित केला आहे.

आलियाने एका नवीन जाहिरातीसाठी एक व्हिडिओ क्लिप शूट केली असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये आलिया नवरीच्या वेशात दिसत आहे. भारतीय लग्न सोहळ्यातील रीतीप्रमाणे प्रत्येक मुलीचे ‘कन्यादान’ केले जाते. परंतु या जुन्या प्रथेवर आलियाने प्रश्न उपस्थित केला असून, या रीतीरिवाजाला नवीन दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न केला आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित ही जाहिरात ‘ब्रायडल वेअर ब्रँड’साठी आहे आणि त्यात आलियाला वधू म्हणून दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आलिया म्हणते की, “लग्नानंतर ‘कन्यादान’चा सोहळाच का? मुलगी दान करायची वस्तू आहे का?”

व्हिडिओमध्ये आलिया आपल्या पतीसोबत मंडपात बसलेल्या लोकांना आपल्या मनातील गोष्ट सांगत आहे. ती तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर असलेले प्रेम व्यक्त करते. तसेच तिच्या आजी, वडील आणि आईबद्दल बोलते. दरम्यान, ती लग्नामधील ‘कन्यादान’ प्रथेच्या विरोधात प्रश्न देखील उपस्थित करते. ती विचारते की, तिच्यावर सगळ्यांचे इतके प्रेम असूनही तिच्या कुटुंबाने तिला नेहमी ‘परकी’ आणि त्यांच्या कुटुंबाचा तात्पुरता भाग का मानले आहे? ती म्हणते “मी काय दान करण्याची वस्तू आहे का? कन्यादानच का?”

https://www.instagram.com/tv/CT7NZY8gMjh/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओच्या शेवटी ‘कन्यादान’ नाही तर ‘कन्यामान’ असे म्हटले आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीच्या या व्हिडिओला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शविली आहे. युजर तिचे जोरदार कौतुक करत आहेत. आलियाच्या चाहत्यांना जाहिरात आणि तिची आधुनिक संकल्पना प्रचंड आवडली आहे. यावर कमेंट्स करताना एका युरजने लिहिले की, “खरं तर ही एक अतिशय सुंदर जाहिरात आहे आणि आलियाने सांगितलेल्या सर्व ओळी सत्य आहेत. प्रत्येक मुलीला ही गोष्ट कधी ना कधी तरी जाणवते. ही जाहिरात ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर प्रत्येक मुलीला ती आवडेल आणि आम्ही ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करू.” ‘दुसऱ्या युजराने लिहिले की,“प्रत्येक मुलीवर प्रेम करा. कन्यामान हे प्रत्येक मुलीचे लग्नानंतरचे भविष्य आहे.” शिवाय आलिया गेल्या काही वर्षांपासून या ब्रँडशी संबंधित आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा