Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड पहिल्या नजरेतील प्रेम! स्नेहाला पाहताच प्रेमात पडला होता अल्लू अर्जुन, घरच्यांनी नकार देऊनही ‘असा’ थाटला संसार

पहिल्या नजरेतील प्रेम! स्नेहाला पाहताच प्रेमात पडला होता अल्लू अर्जुन, घरच्यांनी नकार देऊनही ‘असा’ थाटला संसार

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचा चाहतावर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. फक्त साऊथमध्येच नाही, तर त्याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे. १.२५ करोडपेक्षाही जास्त फॉलोवर्स त्याचे फेसबुकला आहेत. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने ‘विजेता’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले आहे. अल्लू अर्जुन जेवढा त्याच्या अभिनयाने प्रसिद्ध आहे, तेवढाच प्रसिद्ध तो खासगी आयुष्यामुळेपण आहे.

आपल्या घराण्याचा वारसा चालवत हा अल्लू अर्जुन चित्रपटसृष्टीत उतरला, आणि अखंड मेहनत करून आपली प्रसिद्धी सर्वत्र मिळवू लागला. अल्लू अर्जुन गुरुवारी (८ एप्रिल) आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत.

दिनांक ८ एप्रिल, १९८३ साली चेन्नईमध्ये जन्मलेल्या अल्लू अर्जुनची स्नेहाशी पहिली भेट अमेरिकेत मित्राच्या लग्नात झाली होती. स्नेहाला पहिल्यांदा बघताच तो तिच्या प्रेमात पडला. तो एक अभिनेता आहे, हे स्नेहाला ठाऊक होतं, पण तिने कधीही त्याचा चित्रपट पाहिला नव्हता. अल्लूने स्नेहाला पाहताच स्नेहा हसली. मग काय झाली प्रेमप्रकरणाला सुरुवात. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, आणि मग हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. स्नेहा हैदराबादच्या प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर अल्लूने आपल्या वडिलांना स्नेहाच्या घरी जाऊन आपल्या लग्नाची मागणी घालायला सांगितली. अल्लूचे वडील स्नेहाच्या घरी गेले, आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलले. स्नेहाच्या वडिलांनी या दोघांच्या लग्नाला नकार दिला. तथापि, अल्लू आणि स्नेहा दोघेही एकमेकांना सोडण्यास तयार नव्हते. दोघांनीही बर्‍याच प्रयत्नांनंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना मनवले, आणि मग लग्न केले.

या जोडीची खास गोष्ट म्हणजे, स्नेहा जरी या चित्रपटसृष्टीतील नसली, तरीही ती अल्लूच्या व्यावसायिक जीवनास समजते, आणि समर्थन देते. त्यांना अयान व अरहा हे दोन अपत्य आहेत. अल्लूने आपल्या बर्‍याच चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर आणि नंदी पुरस्कार जिंकला आहे. त्याचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगु चित्रपट दिग्दर्शक आहेत, आणि ते प्रसिद्ध तेलुगु अभिनेता चिरंजीवी यांचे नातेवाईक आहेत.

अल्लू अर्जुनने २००३ साली अभिनेता म्हणून करिअरची सुरूवात केली. लालकृष्ण राघवेंद्र राव यांच्या ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे केली होती. अल्लूने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. अल्लू अर्जुन खूप आलिशान जीवन जगतो, आणि त्याला वाहनांची खूप आवड आहे. अल्लूचा जवळपास 100 कोटींचा आलिशान  बंगला आहे, तर त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, जग्वार, ऑडी, रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कारचा संग्रह आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूडच्या पाच सदाबहार अभिनेत्री आज दिसतात ‘अशा’, एक तर ओळखणेही कठीण

-कष्टाचं चीज झालं! अक्षयपासून ते जॅकलिनपर्यंत बॉलिवूड कलाकार करायचे ‘हे’ काम, कोणी होतं कंडक्टर, तर कोणी टॅक्सी ड्रायव्हर

-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या सुचित्रा सेन, लग्नाच्या ५ वर्षांनंतर ठेवले होते सिनेमात पाऊल

हे देखील वाचा