Monday, July 1, 2024

अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. दोघांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा येत असतात. मात्र, आतापर्यंत दोन्ही कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आता हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा’ शेरशाह’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. अशा परिस्थितीत दोघांनी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही.

सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, सिद्धार्थ-कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ स्वत: सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या चित्रपटातील ‘रांझा’ या गाण्यावर कियारासोबत रोमँटिक अवतारात दिसत आहे. (bollywood amid link up rumours sidharth malhotra shares romantic video with kiara advani)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ कियाराला उचलुन घेताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर दोघांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. चाहत्यांना या दोघांची जोडी खूप आवडत आहे. दोघांच्या या रोमॅंटिक केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली आहेत. कमेंट करून युजर्स कियारा आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की. कियारा प्रथम चालत येते, तर सिद्धार्थ रस्त्याच्या कडेला भिंतीजवळ उभा आहे. कियारा येताच ‘शेरशाह’चे ‘रांझा’ हे गाणे वाजू लागते. त्यानंतर सिद्धार्थ कियाराला उचलुन घेतो. हा व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “शेरशाह १२ ऑगस्टला ऍमेझॉन प्राइमवर रिलीझ होत आहे.”

‘शेरशाह’ हा एक बायोग्राफिकल वार चित्रपट आहे, जो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी ऍमेझॉन प्राइमवर रिलीझ होणार आहे. यामध्ये सिद्धार्थ कियारासोबत शिव पंडित, अनिल चरणजीत, निकितिन धीर, साहिल वैद्य हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा