Tuesday, July 9, 2024

कठीण प्रसंगी बिग बींना आली वडिलांची आठवण; केला जुना व्हिडिओ शेअर, एकादा पाहाच

अभिनेते अमिताभ बच्चन सध्या आपल्या घरी आराम करत आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्याचा ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला हाेता, ज्यानंतर त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली हाेती. अशात डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि नियमितपणे पोस्ट शेअर करताना दिसतात. अशात आज त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते त्यांचे बाबूजी आणि दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या काही ओळींची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिग बी म्हणतात, “मन का हो तो अच्छा… ना हो तो और अच्छा… मी अनेकदा माझ्या वडिलांची ही गाेष्ट पुनरावृत्ती करताना दिसताे. मी हे अगणित वेळा सांगितले आहे की, जर ते तुमच्या मनाचे असेल, तर ते चांगले आहे आणि जर ते नसेल तर ते अधिक चांगले आहे. माझ्या वडिलांनी ही गाेष्ट मला खूप आधी शिकवली. पण, त्याचा मुद्दा मला समजू शकला नाही. बाबूजी समजावत असत की, ‘जर तुमच्या इच्छेनुसार गोष्टी घडत नसतील, तर समजून घ्या की, गोष्टी कोणत्या तरी दैवी शक्तीच्या इच्छेनुसार घडत आहेत आणि ती दैवी शक्ती तुमच्याबद्दल कधीही वाईट विचार करणार नाही. तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन पुढे बोलताना दिसतात, “जेव्हा मी संघर्ष करत होतो, तेव्हा बाबूजींना म्हणायचे, ‘आयुष्यात खूप संघर्ष आहेत. ते म्हणायचे, ‘जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत संघर्ष आहे.'” मंडळी, अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओ जुना आहे, जो त्यांनी आज शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत असून चाहते यावर भन्नाट कमेंट करत आहेत. (bollywood amitabh bachchan shares motivational lines written by his father harivansh rai bachchan man ka ho toh achcha )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला

हे देखील वाचा