Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी आपल्या आयुष्यात खूप नाव कमावले. परंतु त्यांच्या बोचक किंवा खाष्ट स्वभावामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांचे मित्र फार कमी बनले. त्यांना कोणतीही गोष्ट मनात ठेवायला जमत नसे, त्यांच्या याच स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्यावर नाराज झाले होते. राजकुमार बॉलिवूडच्या कोणत्याही कलाकारासोबत चांगले वर्तन करत नसल्याचे म्हटले जाते. असे एकदा दोनदा नव्हे, तर अनेकदा त्यांनी कलाकारांचा तोंडावर अपमान केला होता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कलाकारांसोबत असे झाले होते…

रामानंद सागर
अभिनेते रामानंद सागर हे आँखें चित्रपटाच्या कथेसह राजकुमार यांच्याकडे आले होते. या चित्रपटांमध्ये त्यांच्या मित्राला कास्ट करायचे होते. राजकुमार यांनी ही कथा ऐकली पण ती त्यांना फारशी पटली नाही. त्यांनी नकार देण्याऐवजी आपल्या श्वानाला बोलावले आणि विचारले की तू हा रोल करणार का? श्वानाने त्यांच्याकडे बघितले आणि मान हलवली, यावर राजकुमार म्हणाले, ‘बघा, माझा श्वानही ही भूमिका करणार नाही.’ रामानंद सागर हे राजकुमार यांच्यावर नाराज झाले आणि त्यांच्याबरोबर कधीच काम केले नाही.

अमिताभ बच्चन
असे म्हणतात की, एका पार्टीत अमिताभ बच्चन यांनी छान सूट घातला होता, आणि राजकुमारही तिथे होते. राजकुमार यांनी अमिताभ यांच्या सूटचे कौतुक केले आणि विचारले, ‘तुम्ही हा सूट कोणत्या दुकानातून विकत घेतला आहे?’ अमिताभ यांनी दुकानाचे नाव सांगितले, आणि विचारले की तुम्हालाही असा सूट शिवण्याची इच्छा आहे का? यावर राजकुमार म्हणाले, ‘आम्हाला घरासाठी पडदे बनवायचे आहेत, आणि आम्हाला तुमच्या सूटची फॅब्रिक आवडली.’ राजकुमार यांचे हे बोलणे ऐकताच अमिताभ हसले आणि तेथून निघून गेले.

झीनत अमान
सत्तरच्या दशकातील धाडसी आणि सुंदर अभिनेत्री झीनत अमान यांचेदेखील एकदा राजकुमार यांच्याशी खटकले होते. ‘दम मारो दम’ सारख्या गाण्याच्या झीनत अमान या एक उदयोन्मुख अभिनेत्री होत्या. त्यांच्या सौंदर्यावर सर्वत्र चर्चा होती. असे म्हणतात की, जेव्हा राजकुमार आणि झीनत एका पार्टीत भेटले, तेव्हा राजकुमार हसले आणि म्हणाले, “तू छान दिसतेस, नायिका का बनत नाहीस?” यावर झीनत अमान यांनी काय उत्तर दिले ते आजपर्यंत समजले नाही.

सलमान खान
सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाला, आणि या चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत राजकुमार यांना सूरज बडजात्या यांनी बोलावले होते. राजकुमार जेव्हा पार्टीत आले, तेव्हा ते म्हणाले की, आपल्या अभिनेत्याला भेटायचे आहे. सलमान जेव्हा राजकुमार यांना भेटला, तेव्हा त्याने घाईत विचारले, ‘तुम्ही कोण आहात?’ त्याचे बोलणे ऐकून राजकुमार रागावले, आणि ते सलमानला म्हणाले, ‘मुला, तुझ्या वडिलांना विचारून या, आम्ही कोण आहोत?’

गोविंदा
गोविंदा आणि राजकुमार जंगबाज चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान राजकुमार यांनी एकदा गोविंदाला सांगितले की, ‘तुझा शर्ट खूप चांगला आहे.’ त्यांचे म्हणणे ऐकून गोविंदा खूप आनंदीत झाला, आणि तो म्हणाला, ‘तुम्हाला हा शर्ट आवडला असेल तर तुम्ही ठेवा.’ राजकुमार यांनी गोविंदा यांचा हा शर्ट घेतला. नंतर गोविंदाच्या लक्षात आले की, राजकुमार यांनी शर्टचा रुमाल केला होता. गोविंदालाही राजकुमार यांच्या मनाला बोचक बोलण्याचा सामना करावा लागला होता.

बप्पी लहिरी
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांची राजकुमार यांच्याशी झालेली भेटही विशेष होती. असे म्हटले जाते की, राजकुमार यांनी बाप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने घातलले पाहिले, तेव्हा त्यांचे खूप कौतुक केले. त्यांची स्तुती करताना ते म्हणाले, ‘वाह, एकापेक्षा जास्त दागिने घालणे म्हणजे मंगळसूत्रच आहे.’ हे ऐकून बप्पी लहिरी अवाक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट फ्लॉप होऊनही तब्बल १ लाख रुपये फी वाढवायचे अभिनेते राज कुमार, विचारल्यावर दिले होते हैराण करणारे प्रत्युत्तर

-‘दया कुछ तो गडबड है’, म्हणत सीआयडी फेम शिवाजी साटम यांनी आपल्या भूमिकेने पाडली चाहत्यांच्या मनावर छाप, तब्बल ७ चित्रपटात बनले पोलीस

-अधुरी प्रेम कहानी! क्रिकेटपटू आणि बॉलीवूड तारकांच्या पुर्ण न झालेल्या लव्हस्टोरी; कुणी दिला धोका तर कुणी….

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा