Tuesday, June 25, 2024

क्रिती सेननच्या बोल्ड फोटोची प्रशंसा करणे बिंग बींना पडले महागात, ‘दीदी तेरा दादू दिवाना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने नुकतीच तिचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तर सोडाच, पण सेलेब्सही तिच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यापासून स्वत: ला रोखू शकले नाहीत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही क्रितीच्या या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोवर कमेंट केली आहे, ज्याची आता सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. काही युजर्स बिग बींच्या या कमेंटबद्दल मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

क्रिती सेननच्या फोटोवर कमेंट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ‘वाव’ (wow). त्यांच्याद्वारे केलेली ही कमेंट पाहून युजर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करण्यास सुरवात केली. बिग बींच्या कमेंटवर प्रतिक्रिया देणार्‍या एका युजरने लिहिले, ”दीदी तेरा दादू दीवाना.” त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, ”दीदी दादूंच्या भावनांमध्ये तुझा आदर आहे, वाव.” एका युजरने लिहिले, “बच्चन साहेब मजेत, जया आणि रेखा क्रिती सेननच्या शोधात.”

त्याच वेळी, काही युजर्सने बिग बींच्या कमेंटला ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवायलाही सुरुवात केली. एका युजरने लिहिले, ”या कमेंटमध्ये काय वाईट आहे, मला समजत नाही. एखाद्याच्या सौंदर्याचे कौतुक करणे चुकीचे नाही.” दुसरा म्हणाला, “यात काहीही चूक नाही, बस्स करा.” त्याच वेळी बिग बींच्या कमेंटवरील प्रतिक्रिया पाहून, सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने लिहिले, “वाव ही वाव हो गया.”

क्रिती सेननच्या फोटोवर बिग बींनी केलेल्या या कमेंटची सर्वाधिक चर्चा होत आहे. बिग बींची ही कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रितीने तिचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती डीप नेक मॅक्सी ड्रेसमध्ये आपली स्टाईल दाखवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा