Saturday, June 29, 2024

बाॅलिवूडमधील ‘हे’ कलाकार का वापरत नाहीत साेशल मीडिया? ‘नवाब’ सैफने दिले धक्कादायक कारण

कलाकारांसाठी साेशल मीडिया एक असे माध्यम आहे , ज्याच्या आधारे ते चाहत्यांच्या संपर्कात राहू शकतात. साेबतच आपल्या व्यावसायिक आयुष्य व्यतिरिक्त व्यक्ती आयुष्याशी निगडित गाेष्टी सहजरित्या चाहत्यांशी शेअर करू शकता. दुसरीकडे असे ही काही अभिनेते आहे जे साेशल मीडियाशी दुर आहे. अखेर असे काय कारण आहे की, अभिनेते इंस्टाग्राम, टिव्टर या सारख्या साेशल प्लेटफाॅर्म पासुन दुर आहेत? चला जाणुन घेऊया…

हे बाॅलिवूड कलाकार नाही सोशल प्लेटफॉर्मवर
सर्व प्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छिताे की, असे काेणते कलाकार आहे जे रील्सच्या दुनियेपासुन दूर आहे. यामध्ये आमिर खान, सैफ अली खान, रणबीर कपूर, रेखा, रानी मुखर्जी, जया बच्चन, वरनिया हुसैन, अजीत कुमार इत्यादी कलाकार यांचा समावेश आहे,जे साेशल मीडिया प्लेटफाॅर्मचा वापर करत नाही.

साेशल मीडिया न वापरण्याच कारण काय?
सहाजिकच या कलाकारांच्या चाहत्याना असे वाटते की, यानी देखील साेशल मीडियावर यावे जणेकरून  ते त्यांच्या सरळ संपर्कात येऊ शकेल. रणबीर कपूने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, “त्याला या सगळ्या प्लेटफाॅर्मशी जुडण्याची गरज नाही. माझ्या मते माझी चित्रपट लाेकांशी जुळण्याच उत्तम माध्यम आहे. अशात मला नाही वाटत की, साेशल मीडियाचा वापर करायला हवा.” रानी मुखर्जीने देखील एका मुलाखतीत सांगितले की, “तिच्या फाेनमध्ये असा काेणताही ऍप नाही. मी यांच्यापासून दूर राहुन माझी पर्सनल स्पेस एंजाॅय करते. मला असे वाटते की, मी साेशल मीडियासाठी बनलीच नाही आहे.”

साेशल मीडियामुळे वाढते नकारात्मकता
सैफ अली खान एका मुलाखती दरम्यान म्हणाला की, “मी बऱ्याच कलाकांराचे साेशल मीडियावर प्राेफाइल बघितले. मला त्यात कहीही विशेष वाटले नाही. साेबतच मला वाटते की, यामुळे नकारात्मकता जास्त वाढते.” तर दुसरीकडे आमिर खानने आपल्या वाढदिवशी साेशल मीडिया पासुन दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या प्राेडक्शनच एक अकाउंट बनवून ठेवल आहे, ज्यावर ते चित्रपटाशी संबधीत माहिती शेअर करत असतात. हाॅलिवूडचे बरेच कलाकार मुलाखती दरम्यान बाेलले आहे की, “ते आपल्या पर्सनल लाईफला साेशल मीडियावर शेअर करु इच्छित नाही.”

हे हाॅलिवूड कलाकार नाही सोशल प्लेटफॉर्मवर
यामध्ये ब्रेड पिट, रोबर्ट पिटरसन, डेनियल रेडक्लिफ, पीट डेविडसन, मिला कुनीस, कैट विंसलेट, क्रिस्टर्न स्टीवर्ट, एमा स्टोन, स्कारलेट जॉनसन, सेंड्रा बुलोक यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘अल्लाह’साठी आणखी एका अभिनेत्रीने सोडले कलाविश्व, पोस्ट होतेय व्हायरल

देवा रे देवा! कॅटरिनाचा ‘असा’ अवतार बघून सिद्धांत अन् ईशानही घाबरले, व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा